पुसदमध्ये राष्ट्रीय लोकअदालतीत २६४ दावे निकाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:48 IST2021-08-13T04:48:08+5:302021-08-13T04:48:08+5:30
पुसद : येथील जिल्हा व सत्र न्यायालयासह सर्व न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोकअदालत घेण्यात आली. यात जिल्हा सत्र न्यायालयाने सर्वाधिक दावे ...

पुसदमध्ये राष्ट्रीय लोकअदालतीत २६४ दावे निकाली
पुसद : येथील जिल्हा व सत्र न्यायालयासह सर्व न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोकअदालत घेण्यात आली. यात जिल्हा सत्र न्यायालयाने सर्वाधिक दावे निकाली काढले.
जिल्हा सत्र न्यायाधीश-१ व्ही.बी. कुळकर्णी यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रीय लोक अदालत पार पडली. त्यात वादपूर्व प्रकरणे, दिवाणी प्रकरणे, फौजदारी प्रकरणे, मोटार अपघात दावे, इतर किरकोळ फौजदारी प्रकरणे ठेवण्यात आली होती. न्यायाधीश व्ही.बी. कुळकर्णी, न्यायाधीश बी.वाय. फड, दिवाणी न्यायाधीश के.एम.एफ. खान, सहदिवाणी न्यायाधीश एस.एन. नाईक, एन.जी.व्यास, ए.डी. मारगोडे, एम.बी. सोनटक्के, पी.आर. फुलारी, जी.बी. पवार, व्ही.एस. वाघमोडे, डी.बी. साठे आदींनी खटले निकाली काढले. अधीक्षक विलास बंगाले, रवी पेटकर, एन.एस. भोयर, नीलेश खसाळे, प्रवीण कोयरे, एस.पी. ददगाळ यांनी परिश्रम घेतले.
ॲड.डी.एस. देशपांडे, डॉ.बी.आर. देशमुख, ॲड. श्वेता राजे, प्रा.एस.एस. पाटील, ॲड. वैभव जामकर, प्रा. दिनकर गुल्हाने, ॲड. अंबिका जाधव, बाबासाहेब गाडगे, ॲड. राजेंद्र गावंडे, महेश काळे, ॲड. अभिमान खैरमोडे, मिलिंद ससाने, ॲड.डी.डी. पवार, ॲड. गजानन देशमुख, आदींनी लोकआदालतीला सहकार्य केले. या लोकअदालतीत एकूण ७७७ प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी ६१ प्रकरणे तडजोडीने निकाली निघाली. तसेच न्यायालयातील प्रलंबित दिवाणी व फौजदारी प्रकरणे १७२७ ठेवण्यात आली होती. त्यापैकी २६४ प्रकरणे तडजोडीने निकाली निघाली. तालुका विधी सेवा समिती, सर्व न्यायाधीश, न्यायालयीन कर्मचारी, वकील, पक्षकारांनी केलेल्या सहकार्यामुळे हे दावे निकाली काढण्यात यश मिळाले.