शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
2
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
3
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
4
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
5
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
6
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
7
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
8
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
9
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
10
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
11
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
12
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
13
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
14
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
15
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
16
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
17
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
18
Anushka Sharma ची टीम इंडियात एन्ट्री; पदार्पणाच्या सामन्यात चौथ्या क्रमांकवर बॅटिंगला आली अन्...
19
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
20
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
Daily Top 2Weekly Top 5

पुसद १९, दिग्रस तालुक्यात कोरोनाचे १३ बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2020 05:00 IST

तालुक्यात गेल्या २० एप्रिलपासून कोरोनाची सुरुवात झाली. २ सप्टेंबरपर्यंत एकूण ५०३ नागरिकांना कोरोनाची लागण झाली. त्यात शहरातील ९९ रुग्णांचा समावेश आहे. सध्या अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १५१ झाली आहे. २५१ नागरिकांचे अहवाल अद्याप अप्राप्त आहे. याशिवाय काही रुग्णांवर यवतमाळात उपचार केले जात आहे. आतापर्यंत जवळपास ३४५ जणांनी कोरोनावर मात केली आहे.

ठळक मुद्देरुग्णसंख्या वाढली : नागरिकांसह प्रशासनाची तारांबळ, हिवाळा जाणार कठीण

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद/दिग्रस : पुसद शहर व तालुका आणि दिग्रस शहर व तालुक्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. पुसद तालुक्यात आतापर्यंत १९, तर दिग्रस तालुक्यात कोरोनाने १३ जणांचे बळी घेतले आहे.तालुक्यात गेल्या २० एप्रिलपासून कोरोनाची सुरुवात झाली. २ सप्टेंबरपर्यंत एकूण ५०३ नागरिकांना कोरोनाची लागण झाली. त्यात शहरातील ९९ रुग्णांचा समावेश आहे. सध्या अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १५१ झाली आहे. २५१ नागरिकांचे अहवाल अद्याप अप्राप्त आहे. याशिवाय काही रुग्णांवर यवतमाळात उपचार केले जात आहे. आतापर्यंत जवळपास ३४५ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तालुक्यातील इसापूर येथील कोविड सेंटरमध्ये १५१ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहे. तेथील विलगीकरण कक्षात २२७ नागरिक असून १५ नागरिक गृह विलगीकरणात आहे. आतापर्यंत तालुक्यातील १३ जणांचे बळी गेले आहे.२९ ऑगस्ट ते २ सप्टेंबरपर्यंत जवळपास २५१ जणांचे स्वॅब घेण्यात आले. त्यांचे अहवाल अद्याप अप्राप्त आहे. तालुक्यात २ सप्टेंबरला सर्वाधिक ७१ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले होते. त्यामुळे नागरिक व प्रशासनाची तारांबळ उडत आहे. नागरिकांकडून काळजी घेतली जात नसल्याने प्रशासनही अडचणीत सापडले आहे. कोरोना नियंत्रण समितीचे अध्यक्ष तथा तहसीलदार राजेश वजीरे, मुख्याधिकारी शेषराव टाले, गटविकास अधिकारी राजेश खारोडे, ठाणेदार सोनाजी आमले, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.कृष्णा बानोत, कोविड सेंटरचे व्यवस्थापक डॉ.अभय गोविंदवार आदी कोरोना संसर्ग टाळण्यासाठी प्रयत्नरत आहे.प्रशासनाला सहकार्य करावेशहर व तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. तरीही नागरिक बिनधास्त वागत आहे. अनेक ठिकाणी गर्दी केली जात आहे. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ.कृष्णा बानोत यांनी केले आहे. फिजिकल डिस्टन्स पाळणे, मास्क वापरणे, हात स्वच्छ धुणे, गर्दी टाळणे आदी सूचना त्यांनी केल्या. तसेच सर्दी, ताप, खोकला आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्यास तातडीने नजीकच्या रुग्णालयात किंवा कोविड सेंटरमध्ये तपासणी करून घेण्याचे आवाहनही डॉ.बानोत यांनी केले आहे.पुसद तालुक्यात ८६ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णतालुक्यात आतापर्यंत ६४५ जणांना कोरोनाची बाधा झाली. त्यापैकी ५४० जणांनी कोरोनावर मात केली. तूर्तास तालुक्यात ८६ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. रविवारी नव्याने ९५ जणांना सुटी देण्यात आली. रविवारी ५८ रॅपिड टेस्ट करण्यात आला. त्यात १२ पॉझिटिव्ह, तर ४६ जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आशीष पवार यांनी सांगितले. दरम्यान, रविवारी पुसदमधील आरटीपीसीआर चाचणीत ३३, तर रॅपिड अँटिजन टेस्टमध्ये १४ अशा ४७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. दिग्रसमध्येही १९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या