पुसदमध्ये १३९ जणांची कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2020 05:00 IST2020-08-06T05:00:00+5:302020-08-06T05:00:12+5:30

शहर व तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा ब्लास्ट होत आहे. आतापर्यंत एकूण २३३ नागरिकांना कोरोनाची लागण झाली. मात्र १३९ जणांनी कोरोनावर मात केली. तूर्तास तालुक्यात ८७ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहे. याशिवाय अनेकजण अद्यापही क्वारंटाईन आहे. शहर व तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्येत वाढ होत आहे.

In Pusad, 139 people defeated Corona | पुसदमध्ये १३९ जणांची कोरोनावर मात

पुसदमध्ये १३९ जणांची कोरोनावर मात

ठळक मुद्देआणखी नऊ पॉझिटिव्ह : अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णसंख्या पोहोचली ८७ वर

लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : शहर व तालुक्यात कोरोनाचा हैदोस सुरू असताना रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढत आहे. आतापर्यंत १३९ जणांनी कोरोनावर मात केली आहे. एकूण बाधितांचा आकडा २३३ वर पोहोचला आहे.
शहर व तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा ब्लास्ट होत आहे. आतापर्यंत एकूण २३३ नागरिकांना कोरोनाची लागण झाली. मात्र १३९ जणांनी कोरोनावर मात केली. तूर्तास तालुक्यात ८७ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहे. याशिवाय अनेकजण अद्यापही क्वारंटाईन आहे. शहर व तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्येत वाढ होत आहे. मंगळवारी रात्री उशिरा आणखी पाच तर बुधवारी चौघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात वसंतनगरमधील तीन पुरुष आणि महावीर वॉर्डातील एका पुरुषाचा समावेश आहे.
शासन व प्रशासन कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रयत्नशील आहे. मात्र नागरिकांचे आवश्यक प्रमाणात सहकार्य मिळत नाही. परिणामी पॉझिटिव्ह रुग्णसंख्येत सतत वाढ होत आहे. यामुळे प्रशासन आणि नागरिकांमध्येही चिंतेचे वातावरण आहे. आतापर्यंत एकूण सात जणांचे कोरोनाने बळी घेतले आहे. उपविभागीय अधिकारी डॉ.व्यंकट राठोड यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण प्रशासन उपाययोजना करण्यात व्यस्त आहे. तालुका आरोग्य अधिकारी डॉ.आशीष पवार आणि कोविड सेंटरचे नोडल अधिकारी डॉ.हरीभाऊ फुपाटे यांच्या मार्गदर्शनात आरोग्य यंत्रणा कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रयत्नशील आहे. प्रतिबंधित क्षेत्रावर विशेष लक्ष ठेवले जात आहे.

तीन हजार रॅपिड अ‍ॅन्टीजन टेस्ट किट प्राप्त
शहर व तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पुसदसाठी तीन हजार रॅपिड अ‍ॅन्टीजन टेस्ट किटची मागणी जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली होती. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने तीन हजार किट उपलब्ध करून दिल्या आहे. या किट प्राप्त झाल्याने आरोग्य यंत्रणेवरील मोठा ताण कमी झाला आहे. नागरिकांची चाचणी करण्यास आता वेग येणार असल्याचे एसडीओ डॉ.व्यंकट राठोड यांनी सांगितले.

Web Title: In Pusad, 139 people defeated Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.