टायर फुटलेला आॅटोरिक्षा ट्रकवर धडकला

By Admin | Updated: June 19, 2015 02:10 IST2015-06-19T02:10:55+5:302015-06-19T02:10:55+5:30

वणीवरून मारेगावकडे प्रवासी घेऊन येणाऱ्या आॅटोचा मांगरूळजवळ टायर फुटून धावता आॅटो उभ्या ट्रकवर आदळला.

Pull over the tire bursting autorickshaw truck | टायर फुटलेला आॅटोरिक्षा ट्रकवर धडकला

टायर फुटलेला आॅटोरिक्षा ट्रकवर धडकला

नऊ जखमी : चार गंभीर, मांगरूळजवळील घटना
मारेगाव : वणीवरून मारेगावकडे प्रवासी घेऊन येणाऱ्या आॅटोचा मांगरूळजवळ टायर फुटून धावता आॅटो उभ्या ट्रकवर आदळला. ही घटना गुरूवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास घडली. या अपघातात नऊ प्रवासी जखमी झाले. त्यापैकी चार प्रवासी गंभीर जखमी असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी यवतमाळला हलविण्यात आले.
एम.एच.२९-डब्ल्यू.९९४८ क्रमांकाचा आॅटो वणीवरून प्रवासी घेऊन मारेगावकडे येत होता. मांगरूळजवळ आॅटोचा समोरचा टायर फुटल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे रस्त्याच्या बाजूला उभा असलेल्या ट्रक क्रमांक एम.पी.०९-के.डी.८५३१ वर आॅटो धडकला.
या धडकेत आॅटोमधील नऊ प्रवासी जखमी झाले. त्यात शंकर ऋषी सिडाम (१८) रा.मारेगाव, आतीफ महंमद शेख (१८) रा.मारेगाव, अनुप अरविंद आस्वले (२२) रा.पांढरकवडा, प्रदीप उत्तम मुनेवार (३०) रा.यवतमाळ, रतन दादा धानोरकर (२०) रा.मारेगाव, गणेश गायकवाड (५२) रा.मारेगाव, मिराबाई जुनगरी (५०) रा.सगनापूर, सुनंदा बिजाराम हेपट (३५) रा.मंदर, वैभव पिंजरकर (२०) रा.मंदर यांचा समावेश आहे. जखमीपैकी बहुतांश जखमींवर येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी वणी व यवतमाळ येथे हलविण्यात आले. मारेगाव पोलीस पुढील तपास करीत आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Pull over the tire bursting autorickshaw truck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.