पुसद, उमरखेड, वणी येथे ‘दीपोत्सव’चे थाटात प्रकाशन
By Admin | Updated: November 8, 2015 02:36 IST2015-11-08T02:36:02+5:302015-11-08T02:36:02+5:30
यवतमाळ : महाराष्ट्रात ख्यातनाम दिवाळी अंक म्हणून गणला जाणारा ‘लोकमत’चा दिवाळी अंक ‘दीपोत्सव’ प्रकाशित झाला.

पुसद, उमरखेड, वणी येथे ‘दीपोत्सव’चे थाटात प्रकाशन
यवतमाळ : महाराष्ट्रात ख्यातनाम दिवाळी अंक म्हणून गणला जाणारा ‘लोकमत’चा दिवाळी अंक ‘दीपोत्सव’ प्रकाशित झाला. वाचनाची दर्जेदार मेजवाणी देणारा हा अंक यावर्षी आगळ्या पद्धतीने वाचकांच्या अधिक जवळ पोहोचला आहे. मोठ्या शहरांमध्येच प्रकाशनाचे समारंभ करण्याचा प्रघात बाजूला सारत थेट वणी, पुसद, उमरखेडसारख्या तालुक्याच्या शहरांमध्ये शनिवारी ‘दीपोत्सवा’चे थाटात प्रकाशन करण्यात आले.
‘दीपोत्सव’ म्हणजे खऱ्या अर्थाने ज्ञानवर्धक दिवाळी अंक
वणी : येथील विश्रामगृहात शनिवारी सकाळी ‘लोकमत’च्या दीपोत्सवाचे थाटात प्रकाशन करण्यात आले.
शनिवारी वणी येथील विश्रामगृहात आयोजित कार्यक्रमात मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजू उंबरकर, पंचायत समितीचे सभापती सुधाकर गोरे, लोकमान्य टिळक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर वऱ्हाटे, प्रा. होमराज पटेलपैक यांच्या हस्ते दीपोत्सवाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी राजू उंबरकर यांनी ‘लोकमत’चा हा दीपोत्सव अत्यंत वाचनीय असून लहानांपासून ते थोरांपर्यंतच्या सर्वांसाठी यात भरगच्च मजकूर असल्याचे सांगितले. सोबतच ‘लोकमत’च्या सामान्य जनांसाठी असलेल्या बांधीलकीचे कौतुक केले.
प्राचार्य डॉ.शंकर वऱ्हाटे यांनी ‘लोकमत’चा हा दीपोत्सव खऱ्या अर्थाने ज्ञानवर्धक आणि माहितीपूर्ण असल्याचे सांगितले. या दीपोत्सवातून वाचकांना अभिरूचीपूर्ण साहित्य वाचावयास मिळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सभापती सुधाकर गोरे यांनी ज्ञानाचा प्रकाश सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘लोकमत’ने दीपोत्सवाची निर्मिती केली असून हा अंक वाचकांची आवड निश्तिच पूर्ण करेल, अशी आशा व्यक्त केली. प्रा.होमराज पटेलपैक यांनीही विचारांना खतपाणी घालणार आहे, दीपोत्सव असल्याचे सांगितले. यावेळी वणी विभागीय ‘लोकमत’ कार्यालयातील सहकारी उपस्थित होते.