महिला आयोगाची जनसुनावणी
By Admin | Updated: June 16, 2016 02:52 IST2016-06-16T02:52:19+5:302016-06-16T02:52:19+5:30
महिला आयोगाच्यावतीने १७ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे विभागीय जनसुनावणीचे आयोजन करण्यात आले आहे.

महिला आयोगाची जनसुनावणी
यवतमाळ : महिला आयोगाच्यावतीने १७ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे विभागीय जनसुनावणीचे आयोजन करण्यात आले आहे. यवतमाळ जिल्ह्यातील महिलांनी या जनसुनावणीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी केले आहे.
जिल्ह्यानजीक तक्रार दाखल करण्याची सुविधा महिला आयोगाने विभागीय जनसुनावणीचे आयोजन करून उपलब्ध करून दिली आहे. त्या अनुषंगानेच नांदेड येथे १७ जून रोजी जनसुनावणी ठेवण्यात आली आहे. जास्तीत जास्त महिलांना तातडीने न्याय मिळवून देण्याचे आयोगाचे प्रयत्न आहे. त्यामुळेच गेल्या काही दिवसात सुमारे पाचशेवर प्रलंबित तक्रारींचा निपटारा करण्यात आला आहे.
जनसुनावणीनिमित्त सामाजिक न्याय भवन, नांदेड येथे याच दिवशी महिलांचे समुपदेशन आणि त्यांच्या समस्या समोपचाराने सोडविण्यासाठी काम करणारे सरकारी, खाजगी संस्थातील व्यक्ती, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, जिल्हा व तालुकास्तरावर कार्यरत समुपदेशक यांच्यासाठी मार्गदर्शनपर कार्यशाळा घेण्यात येणार आहे. या कार्यशाळेत महिला विषयक कायदे, जेन्डर सेन्सिटीव्हीटी आणि गटचर्चा असे तीन सत्र होणार आहे. या कार्यशाळेचाही संबंधितांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी केले आहे.
लगतच्या जिल्ह्याच्या ठिकाणी महिला आयोगाची जनसुनावणी होत असल्याने महिलांना आपले प्रश्न मांडणे सोयीचे होणार आहे. शिवाय या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांनाही माहितीच्यादृष्टीने फायद्याचे ठरणार आहे. त्यामुळे ही कार्यशाळा महत्त्वपूर्ण मानली जात आहे. (वार्ताहर)