‘ईव्हीएम व्हीव्हीपॅट’वर जनजागृती अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 22:40 IST2018-12-18T22:39:50+5:302018-12-18T22:40:55+5:30
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत व्हीव्हीपॅट असलेल्या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राचा वापर केला जाणार आहे. या मशीनबाबत नागरिकांच्या मनात असलेल्या शंका दूर करण्याच्या उद्देशाने जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत बचत भवनात जनजागृती अभियान प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला.

‘ईव्हीएम व्हीव्हीपॅट’वर जनजागृती अभियान
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत व्हीव्हीपॅट असलेल्या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राचा वापर केला जाणार आहे. या मशीनबाबत नागरिकांच्या मनात असलेल्या शंका दूर करण्याच्या उद्देशाने जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत बचत भवनात जनजागृती अभियान प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. प्रशिक्षण घेतलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांमार्फत २६ डिसेंबरपासून जिल्ह्यात मतदान केंद्रनिहाय प्रात्यक्षिक करून नागरिकांच्या मनातील शंका दूर केल्या जाणार आहे.
प्रशिक्षणप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, सहाय्यक जिल्हाधिकारी भुवनेश्वरी, निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, मार्गदर्शक वैभव येंडे आदी उपस्थित होते. या मशीनबद्दल नागरिकांच्या मनात कोणतीही शंका उद्भवणार नाही, याची काळजी घेऊन नागरिकांच्या शंका दूर करणे गरजेचे आहे.
या प्रक्रियेमध्ये संभाव्य धोके टाळण्यासाठी कोणतीही चूक होऊ देऊ नका, हा विषय संपूर्णपणे आत्मसात करून सतर्क राहण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिल्या. प्रशिक्षणाला जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, कर्मचारी आदी उपस्थित होते.