शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
4
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
5
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
6
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
7
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
8
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
9
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
10
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
11
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
12
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
13
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
14
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
15
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
16
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
18
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
19
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
20
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत

खरिपासाठी बियाणे, खते तत्काळ पुरवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 9:21 PM

जिल्ह्याची अर्थव्यवस्था कृषीवर आधारीत आहे. निसर्ग, पाणी आदी गोष्टी आपल्या हाती नसल्या तरी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर कृषी विभागाचा भर असला पाहिजे. खरीप हंगामाला सुरुवात होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वेळेवर दर्जेदार बियाणे आणि खते उपलब्ध करून देण्याचे नियोजन कृषी विभागाने तत्काळ करावे, अशा सूचना पालकमंत्री मदन येरावार यांनी दिल्या.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांच्या सूचना : नऊ लाख १० हजार हेक्टरवर नियोजन

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्याची अर्थव्यवस्था कृषीवर आधारीत आहे. निसर्ग, पाणी आदी गोष्टी आपल्या हाती नसल्या तरी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर कृषी विभागाचा भर असला पाहिजे. खरीप हंगामाला सुरुवात होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वेळेवर दर्जेदार बियाणे आणि खते उपलब्ध करून देण्याचे नियोजन कृषी विभागाने तत्काळ करावे, अशा सूचना पालकमंत्री मदन येरावार यांनी दिल्या.जिल्हाधिकारी कार्यालयात कृषी विभागातर्फे आयोजित जिल्हा खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार मनोहरराव नाईक, आमदार ख्वाजा बेग, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, विभागीय कृषी सहसंचालक सुभाष नागरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर आदी उपस्थित होते.कृषी विभागाच्या योजना केवळ कागदावर ठेवू नका. शेतकऱ्यांना हंगामात बियाणे व खतांची कमतरता जाणवणार नाही, याची काळजी घ्या. माती परिक्षणासंदर्भात जमिनीचा पोत पाहून शेतकºयांना मार्गदर्शन करा. जलयुक्त शिवार, धडक सिंचन, शेततळ्यांमुळे शेतकºयांना लाभ झाला आहे. या गोष्टींमध्ये सातत्य ठेवण्यासाठी कृषी विभागाने अधिक जोमाने काम करावे, असे ना. येरावार यांनी सांगितले. पीक विमा योजनेत सर्व शेतकºयांना सहभागी करण्याचे प्रयत्न करा, असेही ते म्हणाले.जिल्ह्यात २०१९-२० मध्ये नऊ लाख १० हजार ५०५ हेक्टरवर खरीप हंगामाचे नियोजन करण्यात आले आहे. यात सोयाबीन दोन लाख ७७ हजार ८४२ हेक्टरवर, कापूस चार लाख ५८ हजार ८५६ हेक्टर, तूर एक लाख ३१ हजार १९१ हेक्टर, ज्वारी १५ हजार ८७५ हेक्टर, उडीद ७०३४ हेक्टर, मूग ८६६८ हेक्टर, मका २२० हेक्टर आणि इतर पिके १० हजार ८९१ हेक्टर यांचा समावेश आहे. जिल्ह्यात सोयाबीनची मागणी एक लाख ५६ हजार २८६ क्विंटल आहे. आतापर्यंत ७५ हजार क्विंटल उपलब्ध झाले आहे. कपाशीच्या २५ लाख ४४ हजार १११ पॅकेटची मागणी नोंदविण्यात आली आहे. जिल्ह्यासाठी एकूण खतांची मागणी एक लाख ९८ हजार ७०७ मेट्रीक टन आहे. यापैकी आजघडीला एक लाख ३३ हजार ८६४ मेट्रीक टन खतांची उपलब्धता झाली आहे. यात युरिया, एमओपी, एसएसपी, कॉम्प्लेक्स, एनपीकेएस या खतांचा समावेश आहे.तक्रार नियंत्रण कक्षजिल्हा परिषद आणि पंचायत समिती स्तरावर तक्रार नियंत्रण कक्ष उघडण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते कृषी विभागाच्या योजनांवर आधारीत घडीपत्रिकेचे प्रकाशन करण्यात आले. प्रवीण जाधव आणि काशीराम राठोड यांना जमिनीची आरोग्यपत्रिका पालकमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आली.