माहूर तीर्थक्षेत्र विकास निधी द्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2020 06:00 AM2020-01-22T06:00:00+5:302020-01-22T06:00:08+5:30

माहूर विकासासंदर्भात आजपर्यंत केवळ घोषणा झाल्या. प्रत्यक्षात निधी उपलब्ध होत नसल्याने तीर्थक्षेत्राची विकास कामे ठप्प पडली आहे. त्यामुळे मागील युती शासनाने घोषित केलेला २४0 कोटींचा विकास निधी महाविकास आघाडीच्या शासनाने तत्काळ उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी नगराध्यक्ष शीतल जाधव यांनी केली.

Provide funds for the pilgrimage development | माहूर तीर्थक्षेत्र विकास निधी द्यावा

माहूर तीर्थक्षेत्र विकास निधी द्यावा

Next
ठळक मुद्देनगराध्यक्षांचे साकडे : विधानसभाध्यक्षांना दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
माहूर : माहूर हे आई रेणुका, जगत्गुरु भगवान दत्तप्रभूंची पावनभूमी आहे. या तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी राज्य शासनाने घोषित केलेला विकास निधी तत्काळ उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी येथील नगराध्यक्षांनी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे केली.
माहूरचा विकास पश्चिम महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्राच्या विकास कामाच्या तुलनेत प्रचंड मागे आहे. माहूर विकासासंदर्भात आजपर्यंत केवळ घोषणा झाल्या. प्रत्यक्षात निधी उपलब्ध होत नसल्याने तीर्थक्षेत्राची विकास कामे ठप्प पडली आहे. त्यामुळे मागील युती शासनाने घोषित केलेला २४0 कोटींचा विकास निधी महाविकास आघाडीच्या शासनाने तत्काळ उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी नगराध्यक्ष शीतल जाधव यांनी केली.
माहूर तीर्थक्षेत्राचे थंडबस्त्यात पडलेले सर्व आराखडे तातडीने संबंधित विभागांकडे हस्तांतरीत करून तीर्थक्षेत्राचा विकास करावा, असे निवेदन जाधव यांनी शुक्रवारी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना दिले. पटोले सपत्नीक येथे दर्शनासाठी आले होते. नगराध्यक्ष शीतल जाधव यांनी त्यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मेघराज जाधव, उपनगराध्यक्ष वैशाली तुपदाळे, नगरसेवक राजेंद्र केशवे, आनंद तुपदाळे यांची उपस्थिती होती. माहूर हे प्रमुख तीन शक्तिपीठांपैकी एक असल्याने येथे भाविकांची वर्षभर वर्दळ राहते.

Web Title: Provide funds for the pilgrimage development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.