शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मुंडन करून शेतकऱ्यांनी केला शासनाचा निषेध

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2018 19:14 IST

 विधिमंडळात बोंडअळी ग्रस्त शेतकऱ्यांची शासनाने जाहीर केलेली हेक्टरी ३० हजार ते ३७ हजार ची मदत सरसकट व विनाविलंब देण्यात यावी या मागणीसाठी यवतमाळ जिल्हा शेतकरी संघर्ष समिती,काँग्रेस ,मनसे, राष्ट्रीय युवा संघटन,शेतकरी संघटना,शेतकरी वारकरी संघटना,बेंबला कालवे संघर्ष समिती यांनी पुकारलेल्या चक्री धरणे आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी शेतकऱ्यांनी आंदोलन स्थळी मुंडन करून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मूग गिळून बसलेल्या सरकार चा निषेध केला.

यवतमाळ - विधिमंडळात बोंडअळी ग्रस्त शेतकऱ्यांची शासनाने जाहीर केलेली हेक्टरी ३० हजार ते ३७ हजार ची मदत सरसकट व विनाविलंब देण्यात यावी या मागणीसाठी यवतमाळ जिल्हा शेतकरी संघर्ष समिती,काँग्रेस ,मनसे, राष्ट्रीय युवा संघटन,शेतकरी संघटना,शेतकरी वारकरी संघटना,बेंबला कालवे संघर्ष समिती यांनी पुकारलेल्या चक्री धरणे आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी शेतकऱ्यांनी आंदोलन स्थळी मुंडन करून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मूग गिळून बसलेल्या सरकार चा निषेध केला.           स्थानिक तिरंगा चौकात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या चक्री धरणे आंदोलनाचा आजचा दिवस पुसद विधानसभा मतदार संघाचे होता.शेतकऱ्यांच्या प्रश्नावर असंवेदनशील असलेल्या फडणवीस सरकारच्या निषेधार्थ तब्बल शेतकऱ्यांनी डोक्यावरील केस कापून (मुंडन) कोडग्या सरकारचा निषेध केला .तसेच तरुण कीर्तनकार नंदकुमार माळवे यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा -वेदना बोलके करणारे भावपूर्ण कीर्तन सादर केले.उपस्थित शेतकऱ्यांनी आपल्या मनोगतातून     सत्तारूढ सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांवर जबर प्रहार केले.गेल्या तीन दिवसांपासून ३२०० च्या वर न सरकलेले सोयाबीन चे दर ,दरवर्षी होणारा तूर खरेदीचा सावळा गोंधळ ,या वर्षी खुल्या बाजारात ३५०० ते ४००० च्या घरात असलेले तुरीचे दर आणि अद्यापही सुरू न झालेली तुरीची खरेदी केंद्रे या सर्व   पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांमधील अस्वस्थता प्रकट केली.             आजच्या या धरणे आंदोलनात मतदार संघातील शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीYavatmalयवतमाळGovernmentसरकार