आंबेडकर भवन तोडणाऱ्यांचा निषेध

By Admin | Updated: July 11, 2016 02:18 IST2016-07-11T02:18:47+5:302016-07-11T02:18:47+5:30

दादर (मुंबई) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन तोडणारे गुंड आणि या प्रकाराला जबाबदार असलेले रत्नाकर गायकवाड ....

Protest of those who break Ambedkar Bhavan | आंबेडकर भवन तोडणाऱ्यांचा निषेध

आंबेडकर भवन तोडणाऱ्यांचा निषेध

बौद्ध महासभा : घाटंजी तहसीलदारांना निवेदन
घाटंजी : दादर (मुंबई) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन तोडणारे गुंड आणि या प्रकाराला जबाबदार असलेले रत्नाकर गायकवाड यांना त्वरित अटक करावी या मागणीचे निवेदन तालुका भारतीय बौद्ध महासभेतर्फे तहसीलदारांना देण्यात आले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या वास्तूमध्ये प्रिंटींग प्रेस सुरू केली, प्रबुद्ध भारत, मूकनायक, बहिष्कृत भारत यासारखी वृत्तपत्र चालवून जनजागृती केली, भारतीय राज्य घटनेचे लेखनसुद्धा याच वास्तूमधून केले ती पवित्र वास्तू नेस्तनाबूत करून आपणच ट्रस्टी आहोत, असा आभास निर्माण केला. आता ही जागा बिल्डरच्या घशात घालण्याचा गायकवाड यांचा डाव आहे.
या घटनेचा भारतीय बौद्ध महासभा, भारतीय बहुजन महासंघ, समता सैनिक दलाच्या तालुका शाखेने निषेध नोंदवून गायकवाड व त्यांच्या भाडोत्री गुंडांना अटक करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तहसीलदारांना निवेदन देताना सुनील नगराळे, एन.जी. भगत, रा.वि. नगराळे, प्रदीप गवळी, अजय खोब्रागडे, समाधान कानिंदे, संतोष ओंकार, संजय कांबळे, राजू खरतडे, मधुकर सातपुडके, प्रफुल्ल वनकर, गजानन राठोड, नितीन राठोड, बबिता मेश्राम, अनिल राठोड, वसीमभाई, अमीरभाई, अन्वरभाई, अरविंद भगत, तनवीरभाई, रफिकभाई आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Protest of those who break Ambedkar Bhavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.