शिक्षक आत्महत्याप्रकरणाच्या चौकशीसाठी आंदोलनाचा इशारा
By Admin | Updated: November 10, 2015 03:11 IST2015-11-10T03:11:20+5:302015-11-10T03:11:20+5:30
पंचायत राज समितीच्या चौकशीत पोषण आहारातील तांदळामध्ये ३० किलो त्रुटी आढळल्याने विजय नकाक्षे या शिक्षकाने आत्महत्या केली.

शिक्षक आत्महत्याप्रकरणाच्या चौकशीसाठी आंदोलनाचा इशारा
प्रशासनाला निवेदन : कास्ट्राईब व प्राथमिक शिक्षक संघटनेचा पुढाकार
उमरखेड : पंचायत राज समितीच्या चौकशीत पोषण आहारातील तांदळामध्ये ३० किलो त्रुटी आढळल्याने विजय नकाक्षे या शिक्षकाने आत्महत्या केली. ही घटना दुर्दैवी असून या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कास्ट्राईब कर्मचारी संघटना आणि प्राथमिक शिक्षक संघटनेच्यावतीने देण्यात आला आहे.
अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यातील सिमाडोह प्राथमिक शाळेच्या तपासणीसाठी पंचायत राज समितीचे पथक गेले होते. त्यावेळी तांदळात त्रुटी आढळल्याने शिक्षक नकाक्षे यांनी आत्महत्या केली. या घटनेने सर्व शिक्षकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, असे निवेदन प्रशासनाला देण्यात आले आहे. उमरखेड येथे कास्ट्राईब संघटनेचे अध्यक्ष प्रकाश जाधव, सचिव रमेश विणकरे, शिक्षक संघटनेचे अध्यक्ष साहेबराव माने, सचिव सुनील पवार, सरचिटणीस विजय मुंगे, जिल्हा उपाध्यक्ष विजय माने व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)