महागाव येथे भाजयुमोकडून निषेध मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:52 IST2021-07-07T04:52:10+5:302021-07-07T04:52:10+5:30

(फोटो) महागाव : सोमवारी राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन करण्यात आले. ते निलंबन रद्द ...

Protest march from BJP at Mahagaon | महागाव येथे भाजयुमोकडून निषेध मोर्चा

महागाव येथे भाजयुमोकडून निषेध मोर्चा

(फोटो)

महागाव : सोमवारी राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन करण्यात आले. ते निलंबन रद्द करण्यात यावे, या मागणीसाठी येथे भाजयुमोच्या वतीने मोर्चा काढण्यात आला.

यावेळी महागाव तहसीलदारांमार्फत राज्यपालांना निवेदन पाठविण्यात आले. राज्यातील महाविकास आघाडीचा काळ्या फिती लावून निषेध करण्यात आला.

यावेळी तालुकाध्यक्ष दीपक आडे, शहराध्यक्ष सुरेश नरवाडे, सरचिटणीस योगेश वाजपेयी, सुरेश खंदारे, विशाल डहाळे, भाजयुमो उपाध्यक्ष राहुल आडे, तालुकाध्यक्ष मयूर काळे, प्रकाश भांगे, मंचकराव खंदारे, अशोक कोकरे, संजय चिंतामणी, अरविंद वैद्य, दीपक कऱ्हे, गजानन मोरे, विशाल जाधव, नीलेश नरवाडे, सतीश पाटील कदम, महिला आघाडीच्या कविता खंदारे, तब्बसुम बेग, शिंदे ताई, अनुसया भालगे व भाजप, भाजप ओबीसी आघाडीचे पदाधिकारी, युवा मोर्चा पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Protest march from BJP at Mahagaon