संथारा बंदी निर्णयाला जिल्हाभर विरोध

By Admin | Updated: August 25, 2015 03:06 IST2015-08-25T03:06:24+5:302015-08-25T03:06:24+5:30

‘संथारा’ (सल्लेखना) व्रत परंपरेला राजस्थान उच्च न्यायालयाने आणलेल्या बंदीचा फेरविचार करावा, या

The protest against the district ban on Santhara | संथारा बंदी निर्णयाला जिल्हाभर विरोध

संथारा बंदी निर्णयाला जिल्हाभर विरोध

यवतमाळ : ‘संथारा’ (सल्लेखना) व्रत परंपरेला राजस्थान उच्च न्यायालयाने आणलेल्या बंदीचा फेरविचार करावा, या मागणीसाठी सकल जैन समाजाच्या वतीने सोमवारी जिल्ह्यात ठिकठिकाणी मूक मोर्चा काढण्यात आला. यवतमाळात जिल्हाधिकाऱ्यांना तर तालुका ठिकाणी उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यवतमाळच्या राजेंद्रनगर स्थित मावजी देवजी निसर जैन स्थानकातून निघालेल्या मूक मोर्चाने नागरिकांचे लक्ष वेधले.
जैन समाजात शतकानूशतके संथारा (सल्लेखना) व्रत परंपरा सुरू आहे. परंतु राजस्थान उच्च न्यायालयाने एका निर्णयात यावर बंदी आणली. त्यामुळे जैन समाज बांधवात असंतोष पसरला होता. उच्च न्यायालयाने या निर्णयावर फेरविचार करावा, यासाठी सोमवारी भारत बंदचे आयोजन करण्यात आले होते. त्यानुसारच सकल जैन समाजाच्यावतीने मूक मोर्चाचे आयोजन केले होते. यवतमाळा येथील राजेंद्रनगर स्थित जैन स्थानकातून सकाळी ९.४५ वाजता मूक मोर्चाला प्रारंभ झाला. यात श्वेत वस्त्रधारी शेकडो पुरुष आणि चुनरी साडी परिधान केलेल्या शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या. स्टेट बँक चौक, पोस्ट आॅफीस चौक, एलआयसी चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचला. यावेळी जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांच्यामार्फत राष्ट्रपती, पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. निवेदन देताना सकल जैन समाजाच्यावतीने किशोर दर्डा, जैन सेवा समितीचे अध्यक्ष डॉ.रमेशचंद्र खिवसरा, तरुण क्रांतीकारी मंचचे अध्यक्ष सुभाष काळे, वाघापूर येथील महावीर दिगंबर जैन मंदिराचे सचिव शेखर बंड आणि दिगंबर जैन मंदिर यवतमाळच्या अध्यक्ष सरोजनी चवडे उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आयोजित सभेत किशोर दर्डा, डॉ. रमेशचंद्र खिवसरा यांनी समाज बांधवांना मार्गदर्शन केले. या रॅलीत माजी आमदार कीर्ती गांधी, अ‍ॅड. अमरचंद दर्डा, सीए प्रकाश चोपडा, दिगंबर जैन मंदिराचे सचिव नंदकुमार बदनोरे, जैन श्वेतांबर मूर्तीपूजक संघाचे सुभाष जैन, मोहन गांधी, नरेश लुणावत, अशोक जैन, राजू जैन, विनोद महाजन, प्रमोद शेंडेकर, मुकुंदभाई पतिरा, खेतूभाई दोशी, दिलीप चवरे, अनिल चाणेकर, सुभाष शेंडेकर, रवींद्र काळे, दिनेश बोरा, अशोक कोठारी, राजेश कोठारी, प्रकाशचंद कोटेचा, जितेंद्र गेलडा, संतोष कोचर, प्रशांत दर्डा, अनिल खिवसरा, केसरिया भवनचे कोषाध्यक्ष राजेंद्र खिवसरा, अखिल भारतीय नहीरवाल जैन समाजाचे अध्यक्ष अनिल कळमकर, संध्या कळमकर, बाभूळगावचे प्रकाश छाजेड, आशिष संघई, सीमा दर्डा, जैन महिला समितीच्या प्रमुख चंदा कोटेचा, वंदना बोरुंदिया, शोभाताई पंडित, छायाताई मचाले, ज्योती पिसोळे यांच्यासह श्री श्वेतांबर मूर्तीपूजक श्रीसंघ, भारतीय जैन संघटना शहर शाखा, सयतवाल जैन संघटना आदींचे पदाधिकारी उपस्थित होते. ‘संथारा’ बंदी विरोधात यवतमाळ शहरातील सर्व जैनधर्मीयांची व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद ठेवण्यात आली होती.
बाभूळगाव येथे प्रतिष्ठाने बंद
बाभूळगाव - सकल जैन समाजाच्यावतीने संथारा बंदीला विरोध दर्शविण्यासाठी सोमवारी बाभूळगावातील जैन श्रावक संघाने यवतमाळ येथील मूक मोर्चात सहभागी होऊन आपला पाठिंबा दर्शविला. तसेच बाभूळगाव येथील जैन बांधवांनी प्रतिष्ठाने बंद ठेवली होती.
आर्णी येथे निवेदन
आर्णी - संथारा बंदीच्या विरोधात आर्णी तहसीलदारांना वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाच्यावतीने निवेदन देण्यात आले. यावेळी शांतीलाल कोठारी, कचरुलाल दुग्गड, डॉ. प्रवीण जैन, रमेशचंद्र सुराणा, प्रवीण दुग्गड, संजय दुग्गड, जितेंद्र बंम, अनिल दुग्गड, मनीष झांबड, अजय छल्लाणी यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते.
उमरखेड येथे एसडीओंना निवेदन
उमरखेड - येथील सकल जैन समाजाच्यावतीने संथारा बंदी निर्णयाविरोधात उपविभागीय अधिकारी दीपक सिंघला यांना निवेदन सादर केले. शहरातील प्रमुख मार्गाने मूक मोर्चा काढून समाज बांधव एसडीओ कार्यालयावर पोहोचले. यावेळी अ‍ॅड. संतोष जैन, अभय जैन, पप्पू जैन, विनोद जैन, विकास कस्तुरे, प्रवीण रेदासनी, संजय कस्तुरे, प्रशांत महाजन, विजय जैन, संजय महाजन, रवींद्र जैन, सतीश जैन, चेतन जैन, श्रणिक जैन, शांतीलाल जैन, आदेश जैन, प्रसन्न भंसाली, परेश पानसुरीया, दिलीप कस्तुरे, मनोहर महाजन, संदीप महाजन, संदीप जैन, आनंद जैन, हर्षल बाफना, प्रकाश महेशकर यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते.
पुसद येथे २५ जणांचे मुंडन
पुसद - संथारा बंदीविरोधात पुसद येथे सकल जैन समाजाच्यावतीने मूक मोर्चा काढून उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन दिले. उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा विरोध म्हणून जैन समाजातील २५ जणांनी मुंडन केले. तर जैन समाज बांधवांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवली होती. रॅलीत जैन बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
दिग्रस येथे मूक मोर्चा
दिग्रस - सकल जैन समाज दिग्रसच्यावतीने शिवाजी चौकातून मूक मोर्चा काढून तहसीलदार नितीन देवरे यांना निवेदन देण्यात आले. तसेच व्यापारी बांधवांनी दुपारी १ वाजेपर्यंत आपली प्रतिष्ठाने बंद ठेवली होती. मूक मोर्चात दीपक गड्डा, बबनराव भागवतकर, सतीश मेहता, माजी नगराध्यक्ष भाईलाल गड्डा, नगरसेवक दीपक कोठारी, अ‍ॅड. रवींद्र कोठारी, भरत ओसवाल, नवीनभाई गड्डा, श्रीपाल सिसोदिया, हर्षल शाह, अशोक गुंदेचा, डॉ. प्रदीप मेहता आदी सहभागी झाले होते.
दारव्हा येथे निवेदन
दारव्हा - संथारा बंदीच्याविरुद्ध जैन समाजाच्यावतीने दारव्हाचे तहसीलदार प्रकाश राऊत यांना निवेदन दिले.
यावेळी दारव्हा चातुर्मास समितीचे अध्यक्ष मनोज सिंगी, शांतीलाल साबद्रा, प्रकाश मुथा, दिनेश कोठारी, लखमीचंद बागरेचा, प्रशांत भरूड, संजय खिवसरा, सुभाषचंद चोरडिया, चंद्रशेखर बंड, प्रफुल्ल इंदाने, सुभाष खुरसुले, राजेश खिवसरा, अभय कोठारी, अतुल सिंगी, सुरेखा मुथा, मनीषा सिंगी, नंदा सिंगी, मीनाबाई साबद्रा, गौतम मुथा यांच्यासह शेकडो समाजबांधव यावेळी उपस्थित होते. (लोकमत चमू)

Web Title: The protest against the district ban on Santhara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.