फुलसावंगीत बंगालच्या घटनेचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:44 IST2021-05-06T04:44:30+5:302021-05-06T04:44:30+5:30
फुलसावंगी : येथे बंगालमधील हिंसाचाराच्या घटनेचा भारतीय जनता पार्टीने निषेध नोंदविला. पश्चिम बंगालमध्ये निष्पाप भाजप कार्यकर्त्यांची हत्या, दुकानांची व ...

फुलसावंगीत बंगालच्या घटनेचा निषेध
फुलसावंगी : येथे बंगालमधील हिंसाचाराच्या घटनेचा भारतीय जनता पार्टीने निषेध नोंदविला.
पश्चिम बंगालमध्ये निष्पाप भाजप कार्यकर्त्यांची हत्या, दुकानांची व घराची जाळपोळ, महिलांवर अत्याचार, भाजप कार्यालय ताब्यात घेण्यासारखे प्रकार घडले. या घटनांचा भाजपने निषेध नोंदविला.
लोकशाहीची हत्या करणाऱ्या ममता बॅनर्जीचा धिक्कार असो, तृणमूल काँग्रेस की दादागिरी नहीं चलेगी, अमानवी कृत्याचा निषेध असो, गुंडाराज नहीं चलेगा, जल्लोष नहीं उन्माद है, आदी घोषणा देऊन व काळ्या फिती लावून निषेध करण्यात आला. यावेळी तालुका सरचिटणीस योगेश वाजपेयी, भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष नरेंद्र शिंदे, अमर दळवी, गजानन प्रतापवार, अरुण धकाते, धनंजय शेळके, प्रमोद शेळके, गणेश भगत, किरण ढाले, शरद भडंगे व कार्यकर्ते उपस्थित होते.