शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांचे माहित नाही, पण भुजबळ नाराज असल्याचे ऐकले, त्यांना अंदाज आलाय; जयंत पाटलांचे स्पष्ट संकेत
2
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
3
उद्धव ठाकरे तुम्ही पंज्याला मत द्यायला जाताय, काहीच वाटत नाही का? गुलाबराव पाटलांचा बोचरा सवाल
4
"मी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, पण शेतकरी म्हणून मोदींच्या सभेला गेलो"
5
या निवडणुकीनंतर राज्यातील काही दुकाने बंद होतील, त्यात राज ठाकरेंचेही दुकान; राऊतांची टीका
6
८४ वर्षांपूर्वी दोन भावांनी McDonald'sची केलेली सुरुवात; आज ११९ देशांत ४२००० पेक्षा अधिक आऊटलेस्ट
7
सावधान! इंटरनेटलाच डॉक्टर मानता?; तर तुम्हीही ठरू शकता Idiot Syndrome चे बळी
8
Kangana Ranaut Edcuation : निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या बॉलिवूडच्या 'क्वीन'चं शिक्षण ऐकून बसेल धक्का
9
Swati Maliwal : "माझं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न..."; स्वाती मालीवाल यांनी मारहाण प्रकरणावर मांडली व्यथा
10
निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास 'प्लॅन बी' काय?; अमित शाहांनी सांगितलं विजयाचं सीक्रेट
11
'ममता बॅनर्जींची किंमत किती, 10 लाख?'; माजी न्यायमूर्ती, नेत्याचे आक्षेपार्ह वक्तव्य, टीएमसी संतप्त 
12
ठाणे, अहमदाबाद अन् शेवटी हॉटेल बदलण्यासाठी तयारी...; भावेश भिंडे पोलिसांना कसा सापडला?
13
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
14
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
15
प्रसिद्ध मराठी अभिनेता अमित खेडेकरला मातृशोक; वयाच्या 60 व्या वर्षी मालवली आईची प्राणज्योत
16
अशी महिला, जिनं उभं केलं ₹७००० कोटींचं साम्राज्य; नंतर त्याच कंपनीतून काढून टाकलं, वाचा कोण आहेत त्या?
17
पहिल्याच भेटीत तैमूरचं वागणं पाहून थक्क झाला जयदीप अहलावत; म्हणाला, 'तो मोठ्या स्टाइलमध्ये...'
18
'मुंबई पुणे मुंबई 4' कधी येणार? मुक्ता बर्वे म्हणाली, "मी, स्वप्नील आणि सतीश...'
19
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
20
२०१४ पासून पत्रकार परिषद का घेतली नाही? पंतप्रधान मोदी म्हणाले, 'मी संसदेला उत्तरदायी'

पाचपहूर प्रकल्पाकरिता १.६६ हेक्टरच्या भूसंपादनाचा प्रस्ताव 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2019 7:39 PM

यवतमाळ जिल्ह्यातील पाचपहूर प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी शेवटच्या टप्प्यात १.६६  हेक्टरचा प्रस्ताव शासनस्तरावर पाठविण्यात आला आहे.

अमरावती : यवतमाळ जिल्ह्यातील पाचपहूर प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी शेवटच्या टप्प्यात १.६६  हेक्टरचा प्रस्ताव शासनस्तरावर पाठविण्यात आला आहे. सदर भूसंपादनाची तरतूद करण्यात आली असली तरी बुडीत क्षेत्रात ०.६५ हेक्टर क्षेत्र येत असल्याने त्या प्रस्तावाला महामंडळाची मान्यता मिळाल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. 

पाचपहूर हा लघु प्रकल्प यवतमाळ जिल्ह्यातील झरीजामणी तालुक्यात बोरकाटली गावाजवळील नाल्यावर बांधण्यात आला आहे. या प्रकल्पाला व्दितीय सुधारित प्रशासकीय मान्यता ५३ कोटींची मिळाली होती. आतापर्यंत जुलै २०१९ अखेर सदर प्रकल्पावर ३४.८५ कोटींचा खर्च झाला आहे. या प्रकल्पाकरिता २०१९-२० मध्ये ११.८७ कोटींची तरतूद करण्यात आली होती. 

प्रकल्पाची २००६ मध्ये मूळ प्रशासकीय मान्यता १४.७३ कोटींची होती. त्यानंतर २००९ मध्ये २८.६९ कोटींची प्रथम सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली.  ५३ कोटीेंची २०१६-१७ मध्ये व्दितीय सुप्रमा सदर सिंचन प्रकल्पाला मिळाली. प्रकल्पातून १३३३ हेक्टर सिंचन निर्मितीचे उद्दिष्ट होते. त्यापैकी २०१८ पर्यंत फक्त ९० हेक्टर सिंचन क्षमता निर्मीत झाली. यामध्ये ७.९८२ दलघमी ऐवढा पाणीसाठा आहे.

प्रकल्पाकरिता खासगी, वन व सरकारी अशी एकूण २१३.२७ हेक्टर भूसंपादनाची आवश्यक्ता होती. त्यापैकी २११.६१ हेक्टर जमिनीचे संपादन पूर्ण झाले. १.६६ हेक्टरचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. धरण बांधकाम पूर्ण झाले आहे. याच प्रकल्पाची चौकशी एसीबीकडे होता. परंतु प्रकल्पांच्या कामात काहीही तथ्य आढळून न आल्याने नस्तीबंद करण्याचे पत्र एसीबीच्या अपर महासंचालकांनी अमरावती एसीबीला दिले होते. त्यामुळे सदर प्रकल्पांची चौकशी थांबविली आहे. त्यामुळे हा प्रकल्प चर्चेत आला आहे. 

बंद नलिका वितरण प्रणालीची कामे प्रलंबित

सदर सिंचन प्रकल्पाची बंद नलिका वितरण प्रणालीव्दारे मेन, सबमेन व लॅटरलची एकूण लांबी ३४.८४ किमीची कामे सुरू आहे. मात्र, सदर कामे प्रलंबित असल्याची माहिती आहे. ती कामे मार्च २०२० पर्यंत पूर्ण करण्यासाठी अधिकाºयांनी नियोजन केले आहे. तसेच प्रकल्पाच्या व्दितीय सुप्रमा रज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समिती (एसएलटीएसी) नाशिककडून २२ एप्रिल रोजी मंजूर व त्रिस्तरीय समिती मुंबईकडे सादर करण्यात आला. सुप्रमा प्रस्तावास मंजूर आवश्यक असल्याची बाब नोंदविण्यात आली आहे.

१.६६ हेक्टर भुसंपादनाचा प्रस्ताव पाठविला आहे. परंतु धरणाच्या बुडीत क्षेत्रात ०.६५ हेक्टरच येत असल्याने त्याला महामंडळाची मान्यता मिळाली आहे. त्यानुसार पुढील कारवाई सुरु असल्याचे यवताळचे कार्यकारी अभियंता गणेश राठेड यांनी सांगितले.

टॅग्स :Yavatmalयवतमाळ