पुसद येथे विविध संघटनांतर्फे निषेध
By Admin | Updated: August 21, 2015 02:58 IST2015-08-21T02:58:04+5:302015-08-21T02:58:04+5:30
महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार महाराष्ट्र भूषण बाबासाहेब पुरंदरे यांना शासनाने प्रदान केल्याचा निषेध पुसद येथे विविध संघटनांच्यावतीने करण्यात आला.

पुसद येथे विविध संघटनांतर्फे निषेध
पुसद : महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार महाराष्ट्र भूषण बाबासाहेब पुरंदरे यांना शासनाने प्रदान केल्याचा निषेध पुसद येथे विविध संघटनांच्यावतीने करण्यात आला. स्थानिक शिवाजी चौकात गुरुवारी सकाळी शहर व तालुक्यातील नागरिक एकत्र आले होते. त्यांनी शासनाचा आणि पुरस्कार प्रदान सोहळ्याचा निषेध केला.
मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड, भीम टायगर सेना, बिरसा मुंडा संघटना, मुस्लीम ब्रिगेड, नाभिक सेवा संघटना, जय मल्हार सेना, डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षण परिषद, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, भारत मुक्ती मोर्चा आदी तब्बल १५ विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सर्व प्रथम डॉ.मो. नदीम यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले. त्यावेळी गोवर्धन मोहिते व डॉ. नदीम यांनी सर्व संघटनांच्या वतीने भूमिका मांडून शासनाचा जाहीर निषेध केला. यावेळी मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष नितीन पवार, प्रा. डॉ. संजय खुपासे, प्रकाश पानपट्टे, नितीन पवार, दिगांबर जगताप, शेख नादरे, पिंटू पाटील, यशवंत चौधरी, बाळासाहेब साबळे, संजय एडतकर, प्रा. रवी चापके, अविनाश अडकिने, गिरीधर ठेंगे, गजानन काकडे, गणेश पावडे, राजू दुधे, राधेश्याम जांगीड आदी उपस्थित होते. या प्रसंगी शहर पोलिसांनी सर्व पदाधिकाऱ्यांना स्थानबद्ध केले. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. (प्रतिनिधी)