पारंपरिक वेशभूषेतून राज्यकर्त्यांचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 00:07 IST2017-08-24T00:07:39+5:302017-08-24T00:07:59+5:30
बोगस आदिवासींनी खºया आदिवासींच्या जागांवर नोकरी मिळविली. त्यांच्याविरुद्ध न्यायालयाने कारवाईचे आदेशही दिले.

पारंपरिक वेशभूषेतून राज्यकर्त्यांचा निषेध
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : बोगस आदिवासींनी खºया आदिवासींच्या जागांवर नोकरी मिळविली. त्यांच्याविरुद्ध न्यायालयाने कारवाईचे आदेशही दिले. मात्र सरकार कुठलीही कारवाई करीत नसल्याने संतप्त आदिवासी बांधवांनी अंगाला झाडांची पाने बांधून सरकारच्या धोरणाचा निषेध केला.
बोगस आदीवासींना नोकरीतून काढून टाकण्याच्या मागणीसाठी बुधवारी सर्व आदिवासी समाज संघटनांनी तिरंगा चौकात एकदिवसीय धरणे आंदोलन केले. नियमित धरणे आंदोलनापेक्षा हे आंदोलन वेगळे ठरले. स्वातंत्र्यानंतरही आदिवासी बांधवांचे प्रश्न सुटले नाहीत. खºया आदिवासींच्या जागा बोगस आदिवासींनी बळकावल्या. पावणे ेदोन लाख जागांवर बोगस आदिवासी नोकरी करीत आहेत. या संदर्भात कारवाई करण्याच्या सूचना सर्वोच्च न्यायालयाने दिल्या. मात्र त्याची अंमलबजावणीच केली जात नसल्याचा आरोप आदोलनकर्त्यांनी केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याकडे डोळेझाक केल्याचा आरोप करीत आदिवासी बांधवांनी त्वरित पावले उचलण्याची मागणी केली. यासाठी त्यांनी परंपरागत पोशाख परिधान करून सरकारच्या धोरणाचा निषेध नोंदविला. या आंदोलनात राजू चांदेकर, किशोर उईके, बाळकृष्ण गेडाम, बंडू मेश्राम, विवेक चौधरी, सचिन चचाणे , प्रफुल्ल आडे, निनाद सुरपाम, मनीषा तिरणकर, रेखा कनाके आदी सहभागी झाले होते.