दिग्रस येथे हिंगणघाटच्या घटनेचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 06:00 IST2020-02-12T06:00:00+5:302020-02-12T06:00:09+5:30
हिंगणघाट येथे एका माथेफिरूने प्राध्यापिकेला जिवंत जाळले. यात सोमवारी तिचा मृत्यू झाला. ही घटना घृणास्पद व माणुसकीला काळीमा फासणारी आहे. या घटनेचा सीएए, एनपीआर व एनआरसीविरुद्ध आंदोलन करणाऱ्या महिलांनी तीव्र निषेध केला. प्रथम आंदोलनस्थळी दोन मिनिटे मौन बाळगून मृत प्राध्यापिकेला श्रद्धांजली वाहण्यात आली.

दिग्रस येथे हिंगणघाटच्या घटनेचा निषेध
लोकमत न्यूज नेटवर्क
दिग्रस : येथे केंद्र सरकारविरुद्ध दिल्लीतील शाहीन बागच्या धर्तीवर महिलांचे आंदोलन सुरू आहे. मंगळवारी महिलांनी तहसीलदारांना निवेदन देऊन हिंगणघाट येथील घटनेचा तीव्र निषेध केला.
हिंगणघाट येथे एका माथेफिरूने प्राध्यापिकेला जिवंत जाळले. यात सोमवारी तिचा मृत्यू झाला. ही घटना घृणास्पद व माणुसकीला काळीमा फासणारी आहे. या घटनेचा सीएए, एनपीआर व एनआरसीविरुद्ध आंदोलन करणाऱ्या महिलांनी तीव्र निषेध केला. प्रथम आंदोलनस्थळी दोन मिनिटे मौन बाळगून मृत प्राध्यापिकेला श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर महिलांनी तहसील कार्यालयाकडे कूच केले.
नायब तहसीलदार व्ही.जी. इंगोले यांना निवेदन दिले. त्यातून आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. यावेळी नगराध्यक्ष सदफजहां, नगरसेविका खुर्शिद बानो, माहलका नाजनीन, नगमा गोंडील, रूबीना खानम, पुतलीबी, आफरीन शेख, शबनम चौहान, शबाना आलमवाले, नसीमा चादरिया, रेश्मा पप्पूवाले, खालेदा बानो, रेश्मा नौरंगाबादे, मुमताज बानो, नाजनीन चादरिया यांच्यासह आंदोलनातील शेकडो महिला उपस्थित होत्या.