एसटीच्या धडकेत व्यावसायिक ठार
By Admin | Updated: October 27, 2015 02:55 IST2015-10-27T02:55:09+5:302015-10-27T02:55:09+5:30
एसटी बसने दिलेल्या जबर धडकेत येथील बांधकाम व्यावसायिक ठार झाल्याची घटना धामणगाव मार्गावरील सागर

एसटीच्या धडकेत व्यावसायिक ठार
यवतमाळ : एसटी बसने दिलेल्या जबर धडकेत येथील बांधकाम व्यावसायिक ठार झाल्याची घटना धामणगाव मार्गावरील सागर जिनिंगसमोर सोमवारी सकाळी ९.३० च्या सुमारास घडली. तर अपघातानंतर बस रस्त्याच्या खाली उतरल्यने काही प्रवासी किरकोळ जखमी झाले.
नथ्थूलाल हरणखेडे (५५) रा. अंबिकानगर असे मृताचे नाव आहे. त्यांचा बांधकामावर सेंट्रीग ठेकेदारीचा व्यवसाय होता. सागर जिनिंगमध्ये त्यांचे काम सध्या सुरू आहे. सकाळी सागर जिनिंगमधून आपल्या लुनाने ते शहराकडे येत होते. याचवेळी धामणगाव कडे जाणारी यवतमाळ आगाराच्या भरधाव एसटी बसने (एमएच०६-एस८३५२) त्यांना धडक दिली. ही धडक इतकी जबर होती की काही अंतरापर्यंत हरणखेडे यांना बसने फरफटत नेले. त्यामुळे जाग्यावरच त्यांचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. या प्रकरणी बसचालक प्रकाश डगवार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)