वाढीव क्षेत्रात ‘बॅक डेट’च्या आधारे व्यावसायिक बांधकाम

By Admin | Updated: May 9, 2016 02:23 IST2016-05-09T02:23:22+5:302016-05-09T02:23:22+5:30

नगरपरिषदेच्या हद्द वाढीनंतर बांधकाम शुल्क वाचविण्यासाठी ‘बॅक डेट’ चा आधार घेऊत बिल्डरांनी ग्रामपंचायतीकडून परवानगी घेतल्याचे प्रकार येथे सुरू आहे.

Professional construction based on 'Back Data' in the extended area | वाढीव क्षेत्रात ‘बॅक डेट’च्या आधारे व्यावसायिक बांधकाम

वाढीव क्षेत्रात ‘बॅक डेट’च्या आधारे व्यावसायिक बांधकाम

पालिका प्रशासन अनभिज्ञ : पाच वर्षांपूर्वीच्या परवानगीवर बांधकाम
यवतमाळ : नगरपरिषदेच्या हद्द वाढीनंतर बांधकाम शुल्क वाचविण्यासाठी ‘बॅक डेट’ चा आधार घेऊत बिल्डरांनी ग्रामपंचायतीकडून परवानगी घेतल्याचे प्रकार येथे सुरू आहे. स्थानिक दारव्हा मार्गावरील एका बिल्डरने तर २०११ मध्ये लोहारा ग्रामपंचायतीची परवानगी घेतली आणि बांधकामाला आता सुरुवात केली आहे.
वडगाव आणि लोहारा या परिसरात सार्वाधिक व्यावसायिक बांधकाम केले जात आहे. नागरी वस्तीमध्ये अनेकांनी रुग्णालये थाटली आहेत. याची नगररचना विभाग आणि नगरपरिषदेकडून कोणतीच परवानगी घेतलेली नाही. काहींनी ग्रामपंचायतींच्या माजी कर्मचाऱ्यांना हाताशी धरून बोगस ठरावाच्या आधारे दोन वर्षापूर्वीच परवानगी घेतल्याची कागदपत्रे तयार केली आहे. याचे मोठे रॅकेट शहराच्या वाढीव क्षेत्रामध्ये सक्रिय झाले आहेत. या रॅकेटच्या माध्यमातून मोठी आर्थिक उलाढाल केली जात आहे. गावातील काही नामांकित आर्किटेक्चरचाही या रॅकेटमध्ये सक्रिय सहभाग आहे.
सही शिक्क्याचा वापर करून खोटे दस्तावेज बनविणे हा नवीन प्रकार नाही. त्यामुळे बांधकाम शुल्क वाचविण्यासाठी अनेकांनी हा शॉर्टकट निवडला आहे. याचा त्रास परिसरातील नागरिकांना होत आहे. दारव्हा मार्गावर एका बिल्डरने अशाच पध्दतीने बांधकाम सुरू केले आहे. हे काम करत असताना चक्क शेजारच्या व्यक्तीच्या घराचे वॉल कंम्पाऊड पाडले. याच मार्गावर उद्योग भवन परिसरात एका राजकीय बिल्डराने प्लॉटचा एटंरन्स बदलविण्यासाठी महामार्गावर समांतर रस्त्यावर अतिक्रमण केले आहे. फाईव्हस्टार हॉटेल थाटण्याचा प्रयत्न येथे सुरू आहे. याच मार्गावर असलेल्या दुचाकी, चारचाकीच्या शोरूम चालकांनी महामार्गाला समांतर असलेल्या रस्त्यावर अतिक्रमण केले आहे. त्यामुळे येथे जीवघेणे अपघात होतात. याकडे पालिका प्रशासनाचे कोणतेच लक्ष नाही. राजकीय आणि धनदांडग्यांचे हे अतिक्रमण सामान्यांच्या जीवावर उठणारा आहे. विनापरवागीने गगनचुंबी इमारती बांधकामाचा धडाका सुरू केला आहे. यातून शहरात अनेक समस्या निर्माण होणार आहेत. (कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: Professional construction based on 'Back Data' in the extended area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.