शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
3
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
4
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
5
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
6
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
7
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
8
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
9
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
10
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
11
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
12
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
13
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
14
Anushka Sharma ची टीम इंडियात एन्ट्री; पदार्पणाच्या सामन्यात चौथ्या क्रमांकवर बॅटिंगला आली अन्...
15
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
16
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
17
काय सांगता..! तब्बल 400KM रेंज; 'या' कंपनीने लॉन्च केली दमदार EV स्कूटर, जाणून घ्या किंमत
18
भर वाळवंटात इलेक्ट्रिक कार टेस्लाची बॅटरी संपली, मग 'या' पठ्ठ्यानं असा केला जुगाड; वाचा थरारक अनुभव
19
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
20
२६४ धावांची खेळीच नाही..., तर रोहित शर्माचा हा 'विराट' विश्वविक्रम मोडणंही जवळपास अशक्यच, कधीतरीच घडतो असा 'चमत्कार'!
Daily Top 2Weekly Top 5

सव्वा हेक्टरात दोन लाखांचे उत्पादन

By admin | Updated: February 27, 2015 01:32 IST

पारंपरिक शेतीला फळपिकाची जोड दिल्यास परंपरेने डबघाईस आलेल्या शेतकऱ्यास आर्थिक आधार मिळू शकतो हे हिवरी येथील शेतकरी शे.रशीद शे.महम्मद यांनी दाखवून दिले आहे.

लोकमत प्रेरणावाटयवतमाळ : पारंपरिक शेतीला फळपिकाची जोड दिल्यास परंपरेने डबघाईस आलेल्या शेतकऱ्यास आर्थिक आधार मिळू शकतो हे हिवरी येथील शेतकरी शे.रशीद शे.महम्मद यांनी दाखवून दिले आहे. कापूस, सोयाबीन या पिकासोबतच १.२० हेक्टरात पपई हे फळपीक घेवून यापासून वार्षिक एक लाख ७५ हजाराचे उत्पन्न त्यांनी मिळविले आहे.शे.रशीद शे.महम्मद यांच्याकडे चार हेक्टर शेतजमीन आहे. ते परंपरेने कापूस, सोयाबीन, गहू या पिकाचे उत्पन्न घेतात. दरम्यान त्यांनी कृषी विभाग आणि आत्मा योजनेंतर्गत फळपिकांची माहिती घेवून त्याबाबतचे प्रशिक्षण घेतले. त्यांनी पपई हे पीक घेण्याचे ठरविल्यानंतर सन २०१२-१३ मध्ये १.२० लाख हेक्टरवर लागवड केली. १२ रुपये प्रती झाड याप्रमाणे पपईची १६०० रोपे विकत घेतली. कृषी विभागाने ५० टक्के अनुदानावर ठिंबक सिंचन संच आणि पाच एचपीचा इलेक्ट्रीक मोटर पंप उपलब्ध करून दिला. राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत क्षेत्र विस्तार योजनेतून ५० टक्के अनुदानावर किटकनाशके आणि खते उपलब्ध करून दिली. लागवडीनंतर ११ महिन्यांनी पपईच्या काढणीस सुरुवात झाली. १.२० हेक्टरमध्ये एकूण २५ टन इतके उत्पादन झाले. यासाठी एकूण ४० हजार इतका खर्च आला. खर्च वजा जाता प्रती टन सात हजार याप्रमाणे एक लाख २५ हजार इतका निव्वळ नफा त्यांना झाला. पारंपरिक पिकांसोबत पपईतूनही चांगले उत्पन्न मिळाल्याने शे.रशीद शे.महम्मद यांना चार हेक्टर शेतात एकूण तीन लाख ३३ हजार निव्वळ नफा शिल्लक राहिला आहे. कृषी विभागाने फळपिकाबाबत दिलेल्या प्रशिक्षणामुळे आत्मविश्वास वाढला. ठिंबक सिंचन संचामुळे पिकांना संरक्षित ओलीत मिळू शकले. त्यामुळेच शेत उत्पादनात प्रगती साधता आली, असे शे.रशीद शे.महम्मद यांनी सांगितले. (वार्ताहर)