महिला अत्याचाराच्या समस्या प्रामुख्याने सोडविणार
By Admin | Updated: May 15, 2017 01:04 IST2017-05-15T01:04:49+5:302017-05-15T01:04:49+5:30
शहरातील जातीय सलोखा, वाहतूक व्यवस्था आणि महिला अत्याचाराच्या समस्या प्रामुख्याने सोडविण्यात

महिला अत्याचाराच्या समस्या प्रामुख्याने सोडविणार
अमरसिंग जाधव : उमरखेड येथे शांतता कमिटीची सभा
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरखेड : शहरातील जातीय सलोखा, वाहतूक व्यवस्था आणि महिला अत्याचाराच्या समस्या प्रामुख्याने सोडविण्यात येणार असल्याचे नव्यानेच रुजू झालेले अपर पोलीस अधीक्षक अमरसिंह जाधव यांनी येथे केले.
उमरखेड येथे आयोजित शांतता कमिटीच्या सभेत ते बोलत होते. प्रमुख पाहुणे उपविभागीय पोलीस अधिकारी अजयकुमार बन्सल, माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर, दराटीचे ठाणेदार शैलेंद्र ठाकरे, महागावचे ठाणेदार मिर्झा, बळीराम मुटकुळे, इनायतुल्ला जनाब, ठाणेदार हनुमंतराव गायकवाड उपस्थित होते.
उमरखेड शहरात गणेशोत्सव काळात घडलेल्या घटनेने गालबोट लागले. त्या अनुषंगाने शहराचा आढावा घेण्यासाठी अपर पोलीस अधीक्षक शुक्रवारी दाखल झाले होते. त्यांनी शांतता कमिटी सदस्य, पोलीस पाटील व पत्रकारांची बैठक घेतली.
शहराला बायपासची आवश्यकता असल्याचे यावेळी सांगितले. सभेत माजी आमदार प्रकाश देवसरकर, इनायतुल्ला जनाब, अनिल काळबांडे, दीपक देशमुख, दिलीप सुरते यांनी मनोगत व्यक्त केले. संचालन कांबळे यांनी, आभार सहायक पोलीस निरीक्षक सुभाष उन्हाळे यांनी मानले.