लोकमतच्या संस्काराचे मोती ‘हवाई सफारी’ स्पर्धेचे बक्षीस वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2015 02:00 IST2015-05-02T02:00:11+5:302015-05-02T02:00:11+5:30
दैनिक लोकमतच्या हवाई सफारी परीक्षेचा बक्षीस वितरण समारंभ शुक्रवारी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून येथील प्रताप विद्यालयात घेण्यात आला.

लोकमतच्या संस्काराचे मोती ‘हवाई सफारी’ स्पर्धेचे बक्षीस वितरण
बाभूळगाव : दैनिक लोकमतच्या हवाई सफारी परीक्षेचा बक्षीस वितरण समारंभ शुक्रवारी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून येथील प्रताप विद्यालयात घेण्यात आला.
बक्षीस वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी प्रताप शिक्षण मंडळाचे सहसचिव प्रकाशचंद छाजेड होते. प्रमुख पाहुणे म्हणून संचालक डॉ.अनिल घोडे, भारत इंगोले, मुख्याध्यापक के.आर. शर्मा, राजेंद्र इंगोले, गोपाळराव खडसे, उपमुख्याध्यापिका एस.बी. भारंभे, सुनील बोचरे, लोकमतचे प्रतिनिधी आरिफ अली आदींची उपस्थिती होती.
लोकमतकडून राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांची डॉ.घोडे यांनी प्रशंसा केली. शाळेत आयोजित केल्या जाणाऱ्या विविध स्पर्धांसोबतच सामाजिक जाणिवेतून आपले कार्य विद्यार्थ्यांनी पार पाडावे, असे आवाहन कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रकाशचंद छाजेड यांनी केले.
यावेळी भारत इंगोले यांनीही विचार व्यक्त केले. प्रथम क्रमांकाचे बक्षीस प्रेरणा बबन सदाफळे या विद्यार्थिनीने पटकाविले. द्वितीय धनश्री संजय लोहकरे तर तृतीय क्रमांकाची मानकरी अदिती अजय फुलकर ही ठरली. या विद्यार्थ्यांना अनुक्रमे स्कूल बॅग, वॉटर जग, लंच बॉक्स आदी भेटवस्तू पाहुण्यांच्या हस्ते देण्यात आल्या. तसेच सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व भेटवस्तू देण्यात आले.
संचालन सादिक शेख यांनी केले. प्रास्ताविक व आभार प्रदर्शन लोकमतचे प्रतिनिधी आरिफ अली यांनी केले. या कार्यक्रमाला सर्व शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. (प्रतिनिधी)