लोकमत सखी मंचच्या ‘सुवर्ण स्पर्श’चे बक्षीस वितरण
By Admin | Updated: May 26, 2016 00:10 IST2016-05-26T00:10:19+5:302016-05-26T00:10:19+5:30
लोकमत सखी मंचतर्फे आयोजित ‘सुवर्ण स्पर्श राज्यस्तरीय बक्षीस धमाका - २०१५’ च्या प्रोत्साहनपर बक्षिसाचे वितरण

लोकमत सखी मंचच्या ‘सुवर्ण स्पर्श’चे बक्षीस वितरण
यवतमाळ : लोकमत सखी मंचतर्फे आयोजित ‘सुवर्ण स्पर्श राज्यस्तरीय बक्षीस धमाका - २०१५’ च्या प्रोत्साहनपर बक्षिसाचे वितरण ‘लोकमत’ जिल्हा कार्यालय, गांधी चौक यवतमाळ येथे सुरू झाले आहे. प्रेरणा संदीप शेंडेकर, ममता इसासरे, प्रतिभा शिंदे, प्रीती प्रदीप ठाकरे, मंजुषा विजय कोल्हे, रेखा उमेश वाजपेयी (सर्व यवतमाळ), बबिता टाके, जयश्री वाकोडे (पांढरकवडा) या स्पर्धक प्रोत्साहनपर बक्षिसाच्या मानकरी ठरल्या आहेत.
लोकमत जिल्हा कार्यालयातून दुपारी १२ ते ६ या वेळात बक्षीस प्राप्त करून घेता येईल. सोबत सखी मंचच्या ओळखपत्राची झेरॉक्स प्रत आणणे आवश्यक आहे.
सखी मंचच्या यवतमाळ येथील सदस्यांसाठी ओढणी साडी, मेन रोड यवतमाळव्दारा भाग्यवंत सोडत काढण्यात आली आहे. यात रोहिणी ढोले (तिरुपती नगर, यवतमाळ) या भाग्यवंत ठरल्या आहेत. त्यांना ओढणी साडीव्दारे एक हजार रुपये किमतीची साडी मिळणार आहे. यासाठीचे कुपन लोकमत यवतमाळ जिल्हा कार्यालयातून प्राप्त करून घेता येईल. तसेच भवानी गोल्ड कव्हरिंग, सिल्व्हर कव्हरिंग ज्वेलरीव्दारा सखी मंच सदस्यांसाठी खास सोडत जाहीर केली होती. यात चारुशीला दीपक कोरटकर या सदस्या मानकरी ठरल्या. यासाठीचे कुपन लोकमत जिल्हा कार्यालयातून प्राप्त करून घेता येईल. विजेत्या स्पर्धकांनी आपले पुरस्कार येत्या तीन दिवसात प्राप्त करून घ्यावे, असे आवाहन लोकमत सखी मंचच्या जिल्हा प्रमुख सीमा दर्डा यांनी केले आहे. (वार्ताहर)