शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाविरूद्ध लढ्यात खासगी डॉक्टर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 05:00 IST

रुग्णसेवा हिच ईश्वरसेवा हे ब्रीद समोर ठेवून प्रत्येकजण आपापल्यापरीने उपचार करीत आहे. अलीकडे शहरात मोठ्या प्रमाणात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. या रुग्णांची तपासणी, त्यांच्या संपर्कातील लोकांचा शोध तसेच प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांची तपासणी याशिवाय इतर रुग्णांचा शोध घेऊन प्रादुर्भाव थांबविण्यासाठी शासकीय यंत्रणा अहोरात्र झटत आहे.

ठळक मुद्देसामाजिक उत्तरदायित्व : नेर येथील फिवर क्लिनिकमध्ये देत आहेत दररोज सेवा

लोकमत न्यूज नेटवर्कनेर : कोरोनाला हरविण्यासाठी प्रशासन आपले प्राण धोक्यात घालून काम करीत आहे. अलीकडे मोठ्या संख्येने नेर शहरात रुग्ण आढळल्यामुळे शासकीय आरोग्य सेवेवर मोठा ताण येत होता. शहराचे आरोग्यही आपली जबाबदारी आहे, हे भान ठेवत, आपले सामाजिक उत्तरदायित्व जपत नेर डॉक्टर्स असोसिएशनने फिवर क्लिनिकवर हजेरी लावत रुग्णांची तपासणी करीत आहे.रुग्णसेवा हिच ईश्वरसेवा हे ब्रीद समोर ठेवून प्रत्येकजण आपापल्यापरीने उपचार करीत आहे. अलीकडे शहरात मोठ्या प्रमाणात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. या रुग्णांची तपासणी, त्यांच्या संपर्कातील लोकांचा शोध तसेच प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांची तपासणी याशिवाय इतर रुग्णांचा शोध घेऊन प्रादुर्भाव थांबविण्यासाठी शासकीय यंत्रणा अहोरात्र झटत आहे.या कठीण समयी आपणही योगदान आपल्या शहरासाठी तसेच तालुक्यासाठी देत सामाजिक उत्तरदायित्व जपावे या हेतूने नेर डॉक्टर्स असोसिएशनने सामूहिकरित्या प्रशासनाच्या मदतीला धावून जाण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ते शहरातील विविध फिवर क्लिनिकवर दररोज हजेरी लावत आहे. त्यांच्या माध्यमातून रुग्णांची चोख तपासणी केली जात आहे. यामुळे आरोग्य विभागावर येणारा ताण काही प्रमाणात कमी झाला आहे.खबरदारीचे आवाहननेरच्या प्रत्येक नागरिकाने जबाबदारी ओळखावी व कोरोना संशयित कुणी आढळल्यास प्रशासनाला त्याची माहिती द्यावी. तरुणाईने या कार्यात कोविड रक्षक बनावे. आरोग्य विभागापासून आपला आजार लपवू नये. नजीकच्या फिवर क्लिनिकला जावून तपासणी करावी, व्यापारी बांधवांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, कोरोना संशयित आढळल्यास त्याची माहिती प्रशासनाला द्यावी, अशी विनंती तहसीलदार अमोल पोवार, नगरपरिषद मुख्याधिकारी नीलेश जाधव यांनी केली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdoctorडॉक्टर