कारागृह उपअधीक्षक चिंतामणी यांची बढती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2019 21:42 IST2019-06-30T21:42:02+5:302019-06-30T21:42:15+5:30
अपर पोलीस महासंचालक व कारागृह महानिरीक्षकांच्या आदेशावरुन राज्यातील आठ उपअधीक्षकांना अधीक्षक म्हणून बढती मिळाली आहे. यामध्ये यवतमाळ जिल्हा कारागृहाच्या उपअधीक्षक कीर्ती चिंतामणी यांचा समावेश आहे. शनिवारी पदोन्नतीची यादी जाहीर करण्यात आली.

कारागृह उपअधीक्षक चिंतामणी यांची बढती
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : अपर पोलीस महासंचालक व कारागृह महानिरीक्षकांच्या आदेशावरुन राज्यातील आठ उपअधीक्षकांना अधीक्षक म्हणून बढती मिळाली आहे. यामध्ये यवतमाळ जिल्हा कारागृहाच्या उपअधीक्षक कीर्ती चिंतामणी यांचा समावेश आहे. शनिवारी पदोन्नतीची यादी जाहीर करण्यात आली.
जिल्हा मध्यवर्ती कारागृह उपअधीक्षक पदाची जबाबदारी मागील दोन वर्षापासून कीर्ती चिंतामणी यांच्याकडे आहे. या कार्यकाळात त्यांनी विविध उपक्रम राबविले. तसेच कारागृह उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न केले. त्यामुळे येथेही खुल्या कारागृहाची मान्यता मिळाली.