सिंचन सुविधेलाच प्राधान्यक्रम

By Admin | Updated: January 28, 2016 02:34 IST2016-01-28T02:34:11+5:302016-01-28T02:34:11+5:30

शेतकऱ्यांना सिंचन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नेहमीच प्राधान्य देण्यात आले आहे.

Priority to irrigation facility | सिंचन सुविधेलाच प्राधान्यक्रम

सिंचन सुविधेलाच प्राधान्यक्रम

पालकमंत्री : समता मैदानावर ध्वजारोहणाचा मुख्य सोहळा
यवतमाळ : शेतकऱ्यांना सिंचन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नेहमीच प्राधान्य देण्यात आले आहे. संपूर्ण पाणीटंचाईसह संरक्षित सिंचनाची सोय उपलब्ध करून देण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान हा महत्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. येत्या काळात या अभियानाच्या माध्यमातून शाश्वत सिंचनासह पिण्याच्या पाण्याची मुबलकता निर्माण होईल, असे पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितले.
येथील पोस्टल मैदानावर प्रजासत्ताक दिनाच्या ६६ व्या वर्धापनदिनानिमित्त पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा मुख्य कार्यक्रम पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार भावना गवळी, नगराध्यक्ष सुभाष राय, जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी, पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, अप्पर पोलीस अधीक्षक तथा होमगार्डचे जिल्हा समादेशक डॉ. काकासाहेब डोळे, मुख्य वनसंरक्षक गुरमे, अधीक्षक अभियंता शशिकांत सोनटक्के, राजेंद्र काटपल्लीवार, विजय भटकर, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले आदी उपस्थित होते.
जलयुक्त शिवार अभियानांतर्गत ४१३ गावे निवडण्यात आली होती. यातील ३०२ गावात कामे करण्यात आली. या वषार्साठी पुन्हा २२५ गावे निवडण्यात आली आहे. टप्प्याटप्प्याने जिल्ह्यातील सर्वच गावात या अभियानांतर्गत कामे केली जाणार आहे. भविष्यात एकही गाव टंचाईग्रस्त राहणार नाही, असे पालकमंत्री म्हणाले. सिंचनासाठी शेतकऱ्यांच्या विहिरींना वीज कनेक्शन उपलब्ध होणे आवश्यक आहे. यासाठी विशेष बाब म्हणून शासनाने ५७ कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहे. जिल्ह्यात यवतमाळ आणि आर्णी येथे दोन वीज उपकेंद्राचे काम सुरू आहे. सात नवीन उपकेंद्र मंजूर झाले आहे. या केंद्राचे कामही तातडीने पूर्ण होणार असल्याचे ते म्हणाले.
अन्न सुरक्षा योजनेंतर्गत सरसकट सर्वच शेतकऱ्यांना दोन व तीन रुपये किलो दराने गहू व तांदुळ दिले जात आहे. शासनाच्या या नवीन निर्णयाने जिल्ह्यातील चार लाख शेतकरी नव्याने या योजनेच्या लाभासाठी पात्र ठरले आहे. प्रत्येक शेतकऱ््यास या योजनेचा लाभ देण्याचा प्रयत्न असल्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितले. तुकडेबंदी कायद्यातील सुधारणेमुळे जिल्ह्यात एक एकर क्षेत्राचेही खरेदी विक्रीचे व्यवहार होणार असल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
जिल्ह्याला तब्बल १२३ तलाठी कार्यालयासाठी इमारती मंजूर झाल्या असून यासाठी २८ कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. यवतमाळ येथे केंद्राच्या सहकार्याने सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल निर्माण होणार आहे. यासाठी राज्य शासनाकडून ३० कोटी रुपयांची हमी मिळवून घेतली. जिल्ह्याच्या विकासाला गती देणाऱ्या वर्धा-यवतमाळ-नांदेड या रेल्वे मागार्साठी शासनाने १०४२ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यामुळे या मार्गालाही गती मिळणार आहे.
गेली काही वर्षात सातत्याने शेतकऱ्यांवर संकट कोसळत आहे. असे असले तरी, शेतकऱ्यांनी हिम्मत सोडू नये. शासन भक्कमपणे त्यांच्या पाठीशी उभे आहे. काही अडचण असल्यास मनमोकळेपणाने आम्हास सांगा, पण कुटुंबास उघड्यावर पाडू नका, असे भावनिक आवाहनही पालकमंत्र्यांनी शेतकऱ्यांना केले.
बळीराजा चेतना अभियानांतर्गत सामूहिक विवाह मेळावे घेतले जात आहे. मेळावा घेणाऱ्या संस्थेस प्रती जोडपे २० हजार व मुलीच्या वडीलास १५ हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे. याचा लाभ घेण्याचे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.
ध्वजारोहणानंतर विविध पथकांच्यावतीने पालकमंत्र्यांना मानवंदना देण्यात आली. यावेळी पोलीस, होमगार्ड आदींच्यावतीने पथसंचलनही करण्यात आले. त्यांनतर विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक व देशभक्तीपर कार्यक्रम सादर केले. (वार्ताहर)

Web Title: Priority to irrigation facility

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.