विडूळ येथे अधिकारी, कर्मचाऱ्यांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:26 IST2021-07-09T04:26:49+5:302021-07-09T04:26:49+5:30

विडूळ : येथील ग्रामपंचायतीत अधिकारी, कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी सत्कारमूर्तींनी गावकऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. तलाठी मिलिंद घट्टे, मयूर ...

Pride of officers and employees at Vidul | विडूळ येथे अधिकारी, कर्मचाऱ्यांचा गौरव

विडूळ येथे अधिकारी, कर्मचाऱ्यांचा गौरव

विडूळ : येथील ग्रामपंचायतीत अधिकारी, कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी सत्कारमूर्तींनी गावकऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

तलाठी मिलिंद घट्टे, मयूर मस्के यांचा पदोन्नती झाल्याबद्दल, तर कोतवाल अमृता बनसोड यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार करण्यात आला. तहसीलदार आनंद देऊळगावकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी विचार व्यक्त केले. मागील १३ वर्षांपासून तलाठी मिलिंद घट्टे आणि सहा वर्षांपासून मयूर मस्के येथे कार्यरत होते. कोतवाल म्हणून अमृता बनसोड कार्यरत होते. घट्टे आणि मस्के यांची मंडळ अधिकारी म्हणून पदोन्नती झाली. बनसोड सेवानिवृत्त झाले. विडूळ फाॅर्मर प्रोड्युसर कंपनीतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.

मंचावर निवासी नायब तहसीलदार काशिनाथ डांगे, डॉ. भारत चव्हाण, सरपंच प्रभावती धोपटे, उपसरपंच अमोल लामटीळे, बाळासाहेब माने, गजानन मुलंगे, पांडुरंग हरण आदी उपस्थित होते. कार्यक्रमात जॉनी पठाण, पांडुरंग धुळे, विकास मुलंगे, पांडुरंग हरण यांनी विचार व्यक्त केले. प्रास्ताविक सुदर्शन भवरे, आभार ओमकार करकले यांनी मानले.

Web Title: Pride of officers and employees at Vidul