उसाला २२०० रुपये भाव देणार
By Admin | Updated: November 10, 2016 01:39 IST2016-11-10T01:39:24+5:302016-11-10T01:39:24+5:30
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना यावर्षी २२०० रुपये प्रतिटन भाव मिळणार आहे. तशी घोषणा वसंतचे चेअरमन माधवराव पाटील जळगावकर यांनी केली.

उसाला २२०० रुपये भाव देणार
शेतकऱ्यांना दिलासा : वसंत कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ
मुळावा : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना यावर्षी २२०० रुपये प्रतिटन भाव मिळणार आहे. तशी घोषणा वसंतचे चेअरमन माधवराव पाटील जळगावकर यांनी केली. वसंत सहकारी साखर कारखान्याच्या ४५ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ माधवराव पाटील यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते.
माधवराव पाटील गळीत हंगाम शुभारंभप्रसंगी म्हणाले, आम्ही २१०० रुपये प्रतिटन भाव देण्याचे परिपत्रक काढले. परंतु शेजारच्या महागाव येथील नॅचरल शुगर व हदगावचा भाऊराव सहकारी साखर कारखाना २२०० रुपये प्रतिटन भाव देत आहे. त्यामुळे सभासदांच्या भावना लक्षात घेवून वसंत साखर कारखानासुद्धा प्रतिटन २२०० रुपये भाव देईल. यावेळी दोन लाख टन उसाचे गाळप झाले पाहिजे, हे आमचे उद्दिष्ट असून शेतकऱ्यांनी वसंतलाच ऊस देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केली.
यावेळी संचालक मंडळाचीही अविरोध निवड पार पडली. कारखान्याचे उपाध्यक्ष कृष्णा पाटील देवसरकर यांनी मनोगत व्यक्त केले. २०१५-१६ मध्ये सर्वाधिक ऊस पुरवठा करणाऱ्या बाजीराव कदम, मारोती पतंगे, खंडबाराव लोखंडे आदी ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
शुभारंभ कार्यक्रमाला संचालक चितांगराव कदम, आनंद चिकणे, भीमराव पाटील चंद्रवंशी, तातेराव चव्हाण, अरुण भालेराव, रमेश चौधरी, सुभाष जाधव, नाना चव्हाण, विलास मोरे, सरपंच सविता कदम, कल्याणराव माने, गणेश शिंदे, साहेबराव खडसे, शिवाजीराव देशमुख, शिवप्रसाद सूर्यवंशी, शरद पुरी, अनंत कदम, अभिलाष नाईक, राजेंद्र हाडप, पुंडलिक बडे यांच्यासोबत कंत्राटदार व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)