सोयाबीनच्या दरापेक्षा बियाण्यांची किंमत दुप्पट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2020 05:00 AM2020-05-30T05:00:00+5:302020-05-30T05:00:20+5:30

शेतकऱ्यांनी बियाण्यासाठी सोयाबीन विक्रीचा सपाटा लावला आहे. बाजारात सोयाबीन ३५०० ते ३६०० रूपये क्विंटलपर्यंत विकले जात आहे. सोयाबीन बियाणे बॅगचे दर ७० ते ९० रूपये किलो आहे. सात ते नऊ हजार रूपये क्विंटल दराने बियाणे विकले जात आहे. सोयाबीनपेक्षा बियाण्याचे दर दुप्पट आहेत.

The price of seeds is double the price of soybeans | सोयाबीनच्या दरापेक्षा बियाण्यांची किंमत दुप्पट

सोयाबीनच्या दरापेक्षा बियाण्यांची किंमत दुप्पट

googlenewsNext
ठळक मुद्देकृषी विभाग म्हणतो, घरचेच सोयाबीन पेरा : ‘त्या’ पत्रकाने शेतकरी संभ्रमात

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : खरिप हंगाम तोंडावर असताना बाजारात सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा आहे. त्यातून कृषी विभागाने शेतकऱ्यांना यंदा घरचेचे बियाणे वापरण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे काही शेतकरी बियाण्यासाठी म्हणून आपल्याकडील सोयाबीन विकत आहे. विशेष म्हणजे, सोयाबीनचा बाजारातील दर साडेतीन हजारांच्या घरात असताना आता बियाण्यासाठी हे सोयाबीन ७ ते ९ हजार रुपयांच्या भावाने दिले जात आहे.
गतवर्षी सोयाबीन काढणीच्या काळात परतीचा पाऊस बरसला. यात सोयाबीन बिज निर्मिती क्षेत्राचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याचा फटका बिजोत्पादनाला बसला. बिजोत्पादन कंपन्यांनी यावर्षी सिड निर्मिती केली. मात्र त्याचे प्रमाण काही ठिकाणी कमी झाले आहे. याचा असर बाजारपेठेवर झाला आहे.
तरीही मागणीच्या तुलनेत बियाणे कमी पडणार नाही, असे कृषी विभाग एकीकडे म्हणत आहे. तर दुसरीकडे घरचेच बियाणे वापरा, असे पत्रकही कृषी विभागाने काढले. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम वाढला आहे. शेतकऱ्यांना बिजोत्पादनक्षम बियाणे तयार करता यावे म्हणून प्रत्येक गावामध्ये प्रशिक्षण देण्याची प्रक्रिया राबविली जात आहे. एक वर्ष पेरलेले बियाणे पुढील दोन वर्षे उत्पादनक्षमता पाहून वापरता येते.

सोयाबीन ३५००, बियाणे ७००० रूपये
शेतकऱ्यांनी बियाण्यासाठी सोयाबीन विक्रीचा सपाटा लावला आहे. बाजारात सोयाबीन ३५०० ते ३६०० रूपये क्विंटलपर्यंत विकले जात आहे. सोयाबीन बियाणे बॅगचे दर ७० ते ९० रूपये किलो आहे. सात ते नऊ हजार रूपये क्विंटल दराने बियाणे विकले जात आहे. सोयाबीनपेक्षा बियाण्याचे दर दुप्पट आहेत.

बियाण्याच्या किमती महाग आहेत. अशा स्थितीत घरगुती बियाणे शेतकऱ्यांसाठी फायद्याचे आहे. यामुळे कृषी विभागाने सोयाबीनचे बियाणे घरगुतीच वापरावे अशा आशयाचे प्रसिद्धी पत्रकच काढले आहे.
- नवनाथ कोळपकर,
कृषी अधीक्षक, यवतमाळ

Web Title: The price of seeds is double the price of soybeans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.