पुण्यातील शिक्षणाच्या वारीत घाटंजीचे सादरीकरण
By Admin | Updated: February 9, 2016 02:13 IST2016-02-09T02:13:58+5:302016-02-09T02:13:58+5:30
शालेय शिक्षण विभाग व श्यामची आई फाऊंडेशन पुणे यांच्यावतीने घेण्यात आलेल्या ‘शिक्षणाची वारी’ या शैक्षणिक ...

पुण्यातील शिक्षणाच्या वारीत घाटंजीचे सादरीकरण
घाटंजी : शालेय शिक्षण विभाग व श्यामची आई फाऊंडेशन पुणे यांच्यावतीने घेण्यात आलेल्या ‘शिक्षणाची वारी’ या शैक्षणिक वारीमध्ये प्रगत शैक्षणिक महाराष्ट्रांतर्गत पुणे येथे घेतलेल्या उपक्रमात यवतमाळ जिल्ह्यातून एकमेव घाटंजी तालुक्यातील शिवणी या आदिवासी गावातील जिल्हा परिषद शाळेने सहभाग नोंदविला.
या शाळेच्या चमूने सादर केलेल्या बोली भाषेतून प्रमाण भाषेकडे या उपक्रमाचे अनेकांनी कौतुक केले. राज्यातील ५७ शाळांनी आपले नवोपक्रमाचे स्टॉल लावले होते. त्यामध्ये घाटंजीच्या स्टॉलने लक्ष वेधून घेतले. शाळेतील प्रवीण जाधव, कुंडलिक आत्राम, शरद सोयाम, रुपेश कावलकर या शिक्षकांनी यासाठी परिश्रम घेतले. त्यांच्या या उपक्रमाचे यवतमाळचे सीईओ डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, शिक्षणाधिकारी डॉ. सुचिता पाटेकर तसेच वाल्मिक इंगोले आदींनी कौतुक केले आहे. (प्रतिनिधी)