सैन्यदलात अधिकारी पदाच्या उमेदवारांसाठी पूर्व प्रशिक्षण

By Admin | Updated: July 18, 2016 01:04 IST2016-07-18T01:04:45+5:302016-07-18T01:04:45+5:30

संघ लोकसेवा आयोगाच्या कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसेसची परीक्षेची पूर्व परीक्षेची तयारी करून

Pre-training for officers in the army post | सैन्यदलात अधिकारी पदाच्या उमेदवारांसाठी पूर्व प्रशिक्षण

सैन्यदलात अधिकारी पदाच्या उमेदवारांसाठी पूर्व प्रशिक्षण

यवतमाळ : संघ लोकसेवा आयोगाच्या कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसेसची परीक्षेची पूर्व परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी नाशिक येथे २ आॅगस्ट ते १५ आॅक्टोबरपर्यंत मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी उमेदवारांची निवड २६ जुलै रोजी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कार्यालयात करण्यात येणार आहे.

संघ लोकसेवा आयोगाच्या कंबाईड डिफेन्स सव्हीर्सेसची परीक्षा २३ आॅक्टोबर रोजी घेण्यात येणार आहे. या परीक्षेची पूर्वतयारी करून घेण्यासाठी नाशिक रोड येथील छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र येथे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी प्रशिक्षणार्थींची निवास, भोजन आणि प्रशिक्षणची नि:शुल्क व्यवस्था करण्यात आली आहे.

पात्र उमेदवारांनी यवतमाळ येथे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांच्या कार्यालयात सकाळी ११.३० वाजता उपस्थित राहावे. याबाबत अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक येथे संपर्क साधवा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी धनंजय सदाफळे यांनी केले आहे.

(स्थानिक प्रतिनिधी)

 

Web Title: Pre-training for officers in the army post