तिवसा येथे पतीपाठोपाठ पत्नीनेही सोडला प्राण

By Admin | Updated: May 7, 2017 01:03 IST2017-05-07T01:03:23+5:302017-05-07T01:03:23+5:30

आयुष्यभर साथ दिलेल्या पतीचा मृत्यू झाल्याचे पाहून दु:ख अनावर झालेल्या पत्नीनेही प्राण सोडला.

Pratap was left behind after wife in Tivasa | तिवसा येथे पतीपाठोपाठ पत्नीनेही सोडला प्राण

तिवसा येथे पतीपाठोपाठ पत्नीनेही सोडला प्राण

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : आयुष्यभर साथ दिलेल्या पतीचा मृत्यू झाल्याचे पाहून दु:ख अनावर झालेल्या पत्नीनेही प्राण सोडला. पतीपाठोपाठ पत्नीचाही मृत्यू होण्याची ही हृदयद्रावक घटना यवतमाळ तालुक्यातील तिवसा येथे शनिवारी घडली.
विठ्ठल निंबाजी सखरापुरे यांचे तिवसा येथे वास्तव्य होते. काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्या घरीच उपचार केले जात होते. मात्र उपचाराला प्रतिसाद न देता त्यांचा शनिवारी मृत्यू झाला. मृत्यू झाल्याचे पत्नी कौशल्याबाईला कळताच तिचे दु:ख अनावर झाले. विठ्ठलच्या अंत्यसंस्कारासाठी अंगणात तिरडी बांधण्यात येत होती. त्याचवेळी दु:ख अनावर होवून कौशल्याबाईनेही प्राण त्यागला. या दोघांवर गावकऱ्यांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. पती-पत्नीच्या मृत्यूने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: Pratap was left behind after wife in Tivasa