अवाजवी देयकांमुळे विद्युत ग्राहक त्रस्त

By Admin | Updated: September 29, 2014 00:53 IST2014-09-29T00:53:30+5:302014-09-29T00:53:30+5:30

गेल्या काही महिन्यांंपासून या परिसरातील ग्रामस्थांना प्रत्यक्षातील रिडींगपेक्षा अधिक देयक देऊन महावितरणतर्फे लूट करण्याचा प्रकार घडत आहे़ वाढीव रिडींगच्या प्रकाराकडे वीज वितरण कंपनीच्या

Powerful customers suffer due to unrealistic bills | अवाजवी देयकांमुळे विद्युत ग्राहक त्रस्त

अवाजवी देयकांमुळे विद्युत ग्राहक त्रस्त

नांदेपेरा : गेल्या काही महिन्यांंपासून या परिसरातील ग्रामस्थांना प्रत्यक्षातील रिडींगपेक्षा अधिक देयक देऊन महावितरणतर्फे लूट करण्याचा प्रकार घडत आहे़ वाढीव रिडींगच्या प्रकाराकडे वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
नांदेपेरा परिसरातील ग्रामस्थांना भरमसाठ वीज देयक येत असल्याने वीज ग्राहक त्रस्त झाले आहे़ रिडींग घेणारे कर्मचारी हे अप्रशिक्षीत असल्यामुळे मीटरमधील कोणता आकडा रिडींगचा आहे, हेसुद्धा त्यांना कळेनासे झाले आहे. योग्य माहिती नसल्यामुळे ते कर्मचारी जो आकडा दिसेल, त्याचे छायाचित्र काढून त्याप्रमाणे देयक तयार करीत आहेत. त्यावरूनच वीज वितरण कंपनी आकारणी करून ग्रहकांच्या माथी तेंच देयक थोपवित आहे.
वाढीव देयकामुळे वीज ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे़ वीज देयक दुरूस्ती करण्याकरिता ग्राहक महावितरण कार्यालयात गेले असता तेथील कर्मचारी त्यांना सहकार्य करीत नाही तेथे कर्मचारी असलेच तर ते ग्राहकांना उडवाउडवीची उत्तरे देऊन परत पाठवितात. तुमचे देयक बरोबर आहे, तुम्ही पैशाचा भरणा करा, अन्यथा वीज कापण्यात येईल, असे सांगून ग्राहकांना हाकलून लावतात.
महावितरणचे कनिष्ठ अभियंता व सहाय्यक अभियंता यांच्या कार्यालयाचे अंतर दोन किलोमीटरचे आहे़ कनिष्ठ अभियंता कार्यालयात बहुतांश वेळा दिसतच नाही. देयक कमी करण्यासाठी त्यांच्या कार्यालयात अनेकदा येरझारा माराव्या लागतात.
हा नेहमीचाच प्रकार असून रिडींग घेणाऱ्या कर्मचाऱ्यावर कोणतेही निर्बंध अद्याप लावण्यात आले नाही. परिणामी अंदाजे रिडींग घेण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. मात्र ऐनवेळी अवाजवी देयक येत असल्याने ग्राहक हवालदिल झाले आहे. त्यांच्या नियमित घर खर्चावरही परिणाम होत आहे. (वार्ताहर)

Web Title: Powerful customers suffer due to unrealistic bills

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.