सहा गावातील वीज कापली
By Admin | Updated: September 12, 2016 01:27 IST2016-09-12T01:27:52+5:302016-09-12T01:27:52+5:30
तालुक्यातील सहा गावातील शेतातील वीज कनेक्शन मागील तीन दिवसांपासून कलगाव सब स्टेशन वरुन कापल्यामुळे या गावातील शेतकरी रविवारी

सहा गावातील वीज कापली
आंदोलन छेडण्याचा इशारा : शेतकऱ्यांची आर्णी वीज कार्यालयावर धडक
आर्णी : तालुक्यातील सहा गावातील शेतातील वीज कनेक्शन मागील तीन दिवसांपासून कलगाव सब स्टेशन वरुन कापल्यामुळे या गावातील शेतकरी रविवारी आर्णी येथील विद्युत कार्यालयावर धडकले व आमचे वीज कनेक्शन जोडून द्या, अन्यथा आम्ही आंदोलन छेडू असा इशारा दिला.
आधीच पाऊस नाही, त्यात अरुणावती प्रकल्पातून शेतकऱ्यांनी वारंवार मागणी केल्यावर कॅनलला पाणी सोडण्यात आले. आता वीज कनेक्शन कापले, त्यामुळे पाणी असूनसुद्धा शेतकरी संकटात सापडला आहे. यापूर्वी कलगाव सबस्टेशन वरुनच या शेतकऱ्यांना वीजपुरवठा सुरु होता, मात्र मागील तीन दिवसांपासून कलगाव येथील विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांनी आम्ही पुरवठा करु शकत नाही, ही गावे जास्तीची आहे, असे सांगत पुरवठा कट केला आहे. याबाबत शेतकरी विचारायला गेले तर अधिकारी उद्धट वागतात, असे शेतकरी सांगत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली ही कैफीयत आर्णी येथील कार्यालयात येवून उपअभियंता चेतन मोहकर यांच्या समोर मांडली.
यावेळी शेतकरी शशीकांत झळके डॉ संजय व्यवहारे, संदीप भरने, संजय जयस्वाल, अरूण ईंगोले, मारोती शिकारे, दिगांबर भालेराव, प्रल्हाद मोहाडे, राजेश्वर शिंदे, संदीप थरकडे, किशोर देवकर, शरद थरकडे, पांडुरंग सावळे, गोवर्धन वाघमारे, काशिराम भायमारे, राजकुमार ढोले, ईश्वर वानखेडे, विलास शिंदे, रमेश शिकारे, प्रवीण काळे, चंदु कळंबे, हिंम्मत शेळके, राजकुमार शिकारे, गजानन राऊत, सुरेश थरकडे, गजानन लाखकर, निलेश चौधरी, अरुण लाखकर, शांतीलाल कुटे, चेतन चौधरी, शालिक पारधी, प्रकाश शिंदे, सचीन कडू, रामू इंगोले, प्रवीण पवार, वनदेव शिंदे, पांडू पोटे, मनोहर कडू, सचीन चौधरी, प्रशांत चौधरी, लिंबाजी थरकडे, निलेश चौधरी, परमेश्वर शिंदे आदींसह या सहाही गावातील शेतकरी मोठ्या संख्येने यावेळी हजर होते.
विद्युत पुरवठा कलगाव वरील सबस्टेशन वरूनच त्वरित सुरू करू, असे आश्वासन यावेळी आर्णी विद्युत विभागाचे उपअभियंता चेतन मोहकर यांनी शेतकऱ्यांना दिले. त्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले. (शहर प्रतिनिधी)