महागावात अज्ञात व्यक्तीकडून वीजपुरवठा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:48 AM2021-09-05T04:48:40+5:302021-09-05T04:48:40+5:30

महागाव : येथून जवळच असलेल्या महामार्गावरील कलगाव टी पॉईंटनजीक कट पॉईंट, डबल पोलवरील वीज कंडक्टर टाकून अज्ञात व्यक्तीने वीज ...

Power outage in Mahagaon by an unknown person | महागावात अज्ञात व्यक्तीकडून वीजपुरवठा खंडित

महागावात अज्ञात व्यक्तीकडून वीजपुरवठा खंडित

Next

महागाव : येथून जवळच असलेल्या महामार्गावरील कलगाव टी पॉईंटनजीक कट पॉईंट, डबल पोलवरील वीज कंडक्टर टाकून अज्ञात व्यक्तीने वीज पुरवठा खंडित करण्याचा खोडसाळपणा केला. हा प्रकार शनिवारी घडला.

आठवडाभरापासून शहरातील वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे जनता त्रस्त झाली. वीज वितरण कंपनीत अंतर्गत काम करणाऱ्यांकडून तर हा खोडसाळपणा होत नाही ना? असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. शनिवारी सकाळी हा खोडसाळपणा उघड झाला. कट पॉईंट डबल पोल असलेल्या ठिकाणावर वीज कंडक्टर टाकण्यात आल्याचे वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना दिसून आले. हा खोडसाळपणा करणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध वीज वितरण कंपनी पोलिसात तक्रार दाखल करणार आहे. वरिष्ठ वीज यंत्रचालक दिलीप राजे, लाईनमन शरीफ भाई व अन्य वीज कर्मचाऱ्यांनी वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी परिश्रम घेतले.

040921\img_20210904_082519.jpg

वीज पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न करणारे वीज वितरण कंपनीचे कर्मचारी

Web Title: Power outage in Mahagaon by an unknown person

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.