वीज बळीच्या कुटुंबीयांना मदतीचा हात

By Admin | Updated: June 26, 2017 00:54 IST2017-06-26T00:54:43+5:302017-06-26T00:54:43+5:30

तालुक्यातील आसोली येथे वीज पडून मृत्यु झालेल्या संजय नागोराव वाघमारे व उमेश हरिभाऊ कुमरे यांच्या ...

Power to help the victim's family | वीज बळीच्या कुटुंबीयांना मदतीचा हात

वीज बळीच्या कुटुंबीयांना मदतीचा हात

लोकमत न्यूज नेटवर्क
पांढरकवडा : तालुक्यातील आसोली येथे वीज पडून मृत्यु झालेल्या संजय नागोराव वाघमारे व उमेश हरिभाऊ कुमरे यांच्या वारसांना शासनातर्फे प्रत्येकी चार लाख रूपयांची मदत देण्यात आली.
गेल्या १५ जून रोजी तालुक्यातील आसोली येथील संजय वाघमारे यांच्या शेतात काम करीत असतांना दुपारी ३.१५ वाजताचे सुमारास वीज पडून संजय वाघमारे (४५) यांच्यासह उमेश कुमरे (१७) या दोघांचा मृत्यु झाला होता. तसेच अजय संजय वाघमारे (१९), सुवर्णा किरण वाघमारे (३२), वंदना संजय वाघमारे (४०) व मनश्री किरण वाघमारे (७) हे चार जण जखमी झाले होते.
शुक्रवारी राळेगाव विघानसभा क्षेत्राचे आमदार अशोक उईके यांच्या हस्ते मृत झालेल्या संजय वाघमारे व उमेश कुमरे यांच्या वारसांना प्रत्येकी चार-चार लाख रूपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला. यावेळी तहसिलदार एम.एम.जोरवर, गटविकास अधिकारी घसाळकर, कृषी अधिकारी आत्राम, अरुण देऊळकर, शंकर सामृतवार व गावातील नागरिक उपस्थित होते.

Web Title: Power to help the victim's family