प्राध्यापकांच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा
By Admin | Updated: September 12, 2016 01:45 IST2016-09-12T01:45:06+5:302016-09-12T01:45:06+5:30
राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांच्या मागण्या न्याय्य स्वरुपाच्या असून, त्या सोडविण्यासंदर्भात सरकारची सकारात्मक

प्राध्यापकांच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा
विज्युक्टाचा पुढाकार : शिक्षणमंत्र्यांसोबत बैठक
पुसद : राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांच्या मागण्या न्याय्य स्वरुपाच्या असून, त्या सोडविण्यासंदर्भात सरकारची सकारात्मक भूमिका असल्याचे आश्वासन राज्याचे शालेय शिक्षणमंत्री ना. विनोद तावडे यांनी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघ व विदर्भ ज्युनिअर कॉलेज टिचर्स असोसिएशन अर्थात विजुक्टा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत दिले.
याप्रसंगी २४ वर्षानंतर पात्रता निकष अनुलक्षून सर्वांना निवडश्रेणीसह तब्बल दहा मागण्या मान्य करण्यात आल्यात. कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रशासन स्वतंत्र करण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याचेही शिक्षणमंत्र्यांनी या बैठकीत सांगितले. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघ व विज्युक्टा पदाधिकाऱ्यांची बैठक मंत्र्यांच्या दालनात उत्साहात पार पडली.
यावेळी गृहराज्यमंत्री रणजीत पाटील, आमदार रामनाथ मोते, शिक्षण सचिव नंदकुमार, शिक्षण आयुक्त धीरजकुमार, शिक्षण संचालक भाऊ जरंग, शिक्षण मंडळाचे अध्यक्ष भाऊ म्हमाणे, सहसचिव राजेंद्र पवार, भाऊ गुंजाळ, अवर सचिव भाऊ कापडणीस, महासंघाचे अध्यक्ष प्रा. अनिल देशमुख, विज्युक्टाचे अध्यक्ष प्रा.डॉ. अविनाश बोर्डे, प्रा. संजय शिंदे, प्रा. तळेकर उपस्थित होते. शासनाच्या सकारात्मक भूमिकेकडे राज्यातील ६५ हजार कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांच्या प्रश्नांसाठी विज्युक्टाने वेळोवेळी आंदोलने उभारली असून त्याला आता यश येत आहे. (प्रतिनिधी)