शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

गरिबांची पोरं विमानात बसून जाणार दिल्लीला..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2019 06:00 IST

गरिबांची लेकरं लवकरच खऱ्याखुऱ्या विमानात बसून उडणार आहेत. होय जिल्ह्यातील विद्यार्थी विमानप्रवासाला जाणार आहेत. दिल्लीला. अन् तेही सरकारी खर्चाने. त्याहून विशेष म्हणजे, सरकारी बजेट कमी पडलेच तर स्वत:च्या खिशातून खर्च करू, पण पोरांना विमानात नेऊ, असा निर्धार गुरुजींनी केला आहे.

ठळक मुद्देगुरुजी म्हणतात, होऊ द्या खर्च : समग्र शिक्षा अभियानाच्या बजेटला अधिकारी, कर्मचाऱ्यांचाही हातभार

अविनाश साबापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : वहीचा कागद फाडायचा अन् विमान करून उडवायचे... हाच चाळा ज्यांच्या बालपणीचा खेळ असतो, ती गरिबांची लेकरं लवकरच खऱ्याखुऱ्या विमानात बसून उडणार आहेत. होय जिल्ह्यातील विद्यार्थी विमानप्रवासाला जाणार आहेत. दिल्लीला. अन् तेही सरकारी खर्चाने. त्याहून विशेष म्हणजे, सरकारी बजेट कमी पडलेच तर स्वत:च्या खिशातून खर्च करू, पण पोरांना विमानात नेऊ, असा निर्धार गुरुजींनी केला आहे.जिल्हा परिषद शाळेतील खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांना ही संधी मिळणार आहे समग्र शिक्षा अभियानातून. यासंदर्भात सोमवारी समग्र शिक्षा अभियान कक्षात जिल्हास्तरीय बैठकही पार पडली. उपशिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी आणि विस्तार अधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती.यंदा समग्र शिक्षातून प्रत्येक जिल्ह्यातील निवडक विद्यार्थ्यांसाठी सरकारी खर्चाने सहलीचे आयोजन केले जात आहे. त्यात जिल्ह्याबाहेर आणि राज्याबाहेर असे सहलीचे दोन प्रकार करण्यात आले आहे. त्यादृष्टीने जिल्हास्तरावरून नियोजन सुरू आहे. जिल्ह्याबाहेर जाणाऱ्या सहलीकरीता अकोला, वाशिम, बुलडाणा, चंद्रपूर अशा जिल्ह्यांबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. तर राज्याबाहेर काढण्यात येणाऱ्या सहलीकरिता दिल्ली याच नावावर सर्वांचे एकमत झाल्याचे कळते.या सहलीकरिता जिल्ह्याला समग्र शिक्षातून सव्वाचार लाखांचा निधी मंजूर आहे. त्यापैकी परजिल्हा सहलीकरिता ६५० विद्यार्थ्यांचा खर्च करायचा आहे. तर परराज्यातील सहलीकरिता १०० विद्यार्थ्यांचा खर्च भागवायचा आहे. मात्र दिल्लीच्या सहलीत विमानप्रवास केल्यास या निधीत (प्रती विद्यार्थी ३ हजार) खर्च भागण्याची शक्यता नाही. त्यामुळे अधिकारी, शिक्षकांनी स्वत: काही खर्चाचा भार उचलावा, असे सोमवारच्या बैठकीत सर्वांनी मिळून ठरविले.प्रजासत्ताक दिनाचा मुहूर्त साधणारदरम्यान दिल्लीच्या सहलीसाठी जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात जाण्याचे नियोजन केले जात आहे. शक्यतो, २६ जानेवारीपूर्वी दिल्लीत पोहोचून प्रजासत्ताक दिनाच्या परेडचा आनंद विद्यार्थ्यांना मिळवून देण्याचे प्रयत्न जिल्हास्तरावरून सुरू आहेत. त्यासाठी जिल्ह्यातील दोन्ही खासदारांकडून मदत मिळविण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती आहे. दिल्लीतील सरकारी चकाचक शाळा, संसद भवन, राष्ट्रपती भवन पाहण्याची संधीही विद्यार्थ्यांना मिळण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थीEducationशिक्षण