रस्ता चौपदरीकरणात गरीब बेघर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 21:28 IST2019-03-28T21:28:32+5:302019-03-28T21:28:39+5:30

नागपूर-बोरी-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे अनेक गरीब बेघर झाले आहे. या गरिबांचे घर पाडण्यात आले. मात्र त्यांना अद्याप मोबदला मिळाला नाही. नागपूर-बोरी-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण झपाट्याने सुरू आहे.

Poor homeless in road four-quarters | रस्ता चौपदरीकरणात गरीब बेघर

रस्ता चौपदरीकरणात गरीब बेघर

ठळक मुद्देघराचा मोबदला नाही : नागपूर-बोरी-तुळजापूर राष्ट्रीय महामार्ग

लोकमत न्यूज नेटवर्क
आर्णी : नागपूर-बोरी-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे अनेक गरीब बेघर झाले आहे. या गरिबांचे घर पाडण्यात आले. मात्र त्यांना अद्याप मोबदला मिळाला नाही.
नागपूर-बोरी-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण झपाट्याने सुरू आहे. त्यासाठी तालुक्यातील हजारो हेक्टर जमीन संपादित केली. यापैकी बहुतांश जमीन मालकांना मोबदला दिला. मात्र गावांमधून गेलेल्या महामार्गामुळे अनेक गरीब बेघर झाले. त्यांचे घर चौपदरीकरणासाठी पाडण्यात आले. घरांची मोजणीही झाली. मात्र अद्याप अनेकांना मोबदला मिळाला नाही.
लोणबेहळ परिसरातील जमीन मालकांना मोबदला मिळाला. मात्र याच परिसरातील गरिबांना घरे पाडूनही मोबदला दिला गेला नाही. अनेक गरीब घर पाडल्यामुळे उघड्यावर आले आहे. घरातील वृद्ध व चिमुकले संकटात सापडले. त्यांना कर्णकर्कश हॉर्न व प्रदूषणाचा सामना करावा लागत आहे. धुळीमुळे आरोग्य धोक्यात आले आहे. अनेक कुटुंब रस्त्याच्या कडेला दिवस काढत आहे. मोबदला मिळाल्याशिवाय त्यांना दुसरे घर बांधणे अशक्य झाले आहे.
महामार्ग उठला जीवावर
महामार्गासाठी गरिबांची घरे पाडून जागा संपादित केली. त्यामुळे हा महामार्ग आमच्या जीवावर उठल्याची प्रतिक्रिया लोणबेहळच्या अनुसया पुरके यांनी व्यक्त केली. घराचे सर्वेक्षण झाले. मात्र काहींनी अद्याप घराचा ताबा सोडला नाही. रस्त्याचा आम्हाला खूप त्रास होत असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Poor homeless in road four-quarters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.