शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
3
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
4
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
5
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
6
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
7
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
8
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
9
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
10
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
11
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
12
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
13
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
14
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
15
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
16
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
17
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
18
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
19
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
20
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार

सधन साहित्यिकांसाठी रोखले गरिबांच्या रोजगाराचे साधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 00:07 IST

सरस्वतीचे साधक, देशभरातील गणमान्य लेखक ताजेतवाने चेहरे घेऊन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या भव्य मांडवात बोलत होते, ऐकत होते. अन् त्याच मांडवाच्या दारात शे-दोनशे कष्टाचे पाईक मात्र मजुरीविना तळमळत होते.

ठळक मुद्दे२०० मजुरांचा वांदा : सारस्वतांच्या दारात अडला माणसांचा लिलाव

अविनाश साबापुरे ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ (राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्यनगरी) : सरस्वतीचे साधक, देशभरातील गणमान्य लेखक ताजेतवाने चेहरे घेऊन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या भव्य मांडवात बोलत होते, ऐकत होते. अन् त्याच मांडवाच्या दारात शे-दोनशे कष्टाचे पाईक मात्र मजुरीविना तळमळत होते. आशाळभूत नजरेने साहित्यिकांच्या गर्दीकडे पाहात होते. गर्दीवर फिरून आलेली नजर पुन्हा शून्यात बुडत होती. आजचा दिवस कसा लोटायचा, हा सवाल मात्र साहित्याच्या सोहळ्यातूनही सुटू शकला नाही...प्रसंग होता साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाचा. पण प्रश्न होता दोनशे मजुरांच्या लिलावाचा.. हाताला काम मिळण्याच्या प्रतिक्षेचा. यवतमाळात शुक्रवारपासून जिथे अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा उरूस भरला, त्याच जत्रेच्या पुढे दररोज मजुरांचा लिलाव होतो. पण शुक्रवारी साहित्य संमेलनासाठी रस्त्यांवरची वाहतूक वळविण्यात आली. त्यातच पुनम चौकात होणारा मजुरांचा लिलावही रोखण्यात आला.क्रिकेटच्या ‘आयपीएल’साठी जसा खेळाडूंचा कोट्यवधी रूपयांत लिलाव होतो, तसाच यवतमाळात दररोज मजुरांचा ठेकेदारांकडून हर्रास होतो. गेल्या १५ वर्षांपासून पुनम चौकात हा रतीब सुरू आहे. २५-३० ठेकेदार हा लिलाव करतात. त्यातून २०० पेक्षा अधिक मजुरांना दिवसभराचे काम मिळते. पण साहित्य संमेलनाच्या भाऊगर्दीत हा लिलावच झाला नाही. पहाटेच पुनम चौकात रोजच्या प्रमाणे मजुरांची गर्दी लिलावासाठी जमली. त्याचवेळी प्रतिभावंत साहित्यिकांचीही वर्दळ वाढली. पोलिसांचा बंदोबस्त होता, वाहतूक रोखण्यात आली अन् मजुरांचा लिलाव झालाच नाही. सारस्वतांच्या मांडवाच्या दारातच भाकरीचा शोध असा विरोधाभास निर्माण झाला होता.आमचा रोज कोण देणार?दिनेश रेड्डी, जनार्दन भगत, संजय शेलारे, अमोल कवाडे, हरिदास राडरी, सुधाकर सोनटक्के, क्रिष्णा पानतनवार, गजानन गुरनुले अन् शेकडो मजुरांची गर्दी संमेलनाच्या प्रवेशद्वाराजवळच ठेकेदार येतील आणि आपल्याला कामासाठी नेतील म्हणून ताटकळत होती. नंतर त्यांना कळले आज लिलाव होणारच नाही. ‘हे संमेलन तीन दिवस हाये. मंग तीन दिवस जर आमची हर्रासी झाली नाई तं आमचा रोज कोण देणार?’ हा मजुरांचा आर्त सवाल मात्र संमेलनातही अनुत्तरित राहिला.

टॅग्स :Marathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलनYavatmalयवतमाळ