सायबर गुन्हेगारीवर पोलिसांचा वॉच

By Admin | Updated: July 30, 2015 02:13 IST2015-07-30T02:13:50+5:302015-07-30T02:13:50+5:30

इंटरनेटच्या स्वैर वापरामुळे गेल्या काही दिवसांत सायबर गुन्हे वाढले आहेत. सिमकार्ड विक्रेते आणि सायबर कॅफेचे संचालक वारंवार सूचना देऊनही नियमांचे पालन करीत नाहीत.

Police Watch on Cyber ​​Crime | सायबर गुन्हेगारीवर पोलिसांचा वॉच

सायबर गुन्हेगारीवर पोलिसांचा वॉच

नियम पाळा : सिमकार्ड विक्रेते, सायबर कॅफेधारकांना कडक निर्देश
यवतमाळ : इंटरनेटच्या स्वैर वापरामुळे गेल्या काही दिवसांत सायबर गुन्हे वाढले आहेत. सिमकार्ड विक्रेते आणि सायबर कॅफेचे संचालक वारंवार सूचना देऊनही नियमांचे पालन करीत नाहीत. अखेर पोलीस अधीक्षकांनी या बाबीची गंभीर दखल घेत काटेकोरपणे नियम न पाळल्यास कठोर कारवाई करण्याचा निर्वाणीचा इशारा दिला आहे.
इंटरनेटद्वारे होणाऱ्या समाजविघातक कृत्यांना आळा घालण्यासाठी मंगळवारी पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंग यांनी पोलीस मुख्यालयात बैठक घेतली. त्यात जिल्ह्यातील सिमकार्ड विक्रेते, वितरक, सायबर कॅफेचे संचालक उपस्थित होते. सिमकार्ड विकताना ग्राहकाच्या छायाचित्राची खात्री करून घ्यावी, ओळखपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, आधारकार्ड याची पडताळणी करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. तसेच इंटरनेट कॅफेवरील ग्राहकाची संपूर्ण माहिती आवश्यक दस्तावेजांसह खात्रीपूर्वक भरून घ्यावी, असेही बजावण्यात आले. कॅफेमध्ये कमीत कमी एक वर्षाचे रजीस्टर असावे. ग्राहकाचे नाव, पत्ता, लिंग, संपर्क क्रमांक, ओळखपत्र, लॉगइन व लॉगआउटच्या वेळाही तंतोतंत लिहिण्यासाठी एसपींनी बजावले. खात्रीलायक ओळखपत्र दिल्याशिवाय कोणत्याही ग्राहकाला आता इंटरनेट कॅफेमध्ये बसता येणार नाही. कोणत्याही परिस्थितीत अठरा वर्षांखालील मुलांना कॅफेमध्ये प्रवेश देता येणार नाही. पोलिस अधीक्षकांनी दिलेल्या या निर्देशांचे काटेकोर पालन न केल्यास कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Police Watch on Cyber ​​Crime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.