पोलिसांचे आजपासून ‘आॅपरेशन मुस्कान’

By Admin | Updated: July 1, 2015 00:24 IST2015-07-01T00:24:15+5:302015-07-01T00:24:15+5:30

जिल्ह्यातील १८ वर्षाखालील मुलांचा शोध घेण्यासाठी पोलीस आणि सामाजिक संघटनांच्या मदतीने ‘आॅपरेशन मुस्कान’ राबविण्यात येत आहे.

Police today said the 'Operation Smile' | पोलिसांचे आजपासून ‘आॅपरेशन मुस्कान’

पोलिसांचे आजपासून ‘आॅपरेशन मुस्कान’

एसपींची पत्रपरिषद : हरविलेल्या मुलांचा शोध घेणार, विभागीय मुख्यालय यवतमाळात
यवतमाळ : जिल्ह्यातील १८ वर्षाखालील मुलांचा शोध घेण्यासाठी पोलीस आणि सामाजिक संघटनांच्या मदतीने ‘आॅपरेशन मुस्कान’ राबविण्यात येत आहे. याची सुरूवात १ जुलैपासून करणार असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंग यांनी मंगळवारी पत्रपरिषदेत सांगितले.
केंद्रीय गृहसचिवांनी दिलेल्या निर्देशानुसार हे अभियान राबविण्यात येत आहे. ही संकल्पना सर्वप्रथम गाझियाबाद व झारखंड पोलिसांनी राबविली. यामध्ये गाझियाबाद येथील हरविलेल्या २२७ मुलांचा तर झारखंड येथील १४७ मुलांचा शोध लागला. याची दखल घेऊन केंद्रीय गृहसचिवांनी संपूर्ण राज्यांनाच या पद्धतीचे अभियान राबविण्याची सूचना दिली. त्यासाठी प्रत्येक ठिकाणी ‘अ‍ॅन्टी ह्यूमन ट्रॅफीकींग युनिट’ (एएसयू) स्थापन करण्यात येत आहे. यवतमाळ येथे यवतमाळसह अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशिम या पाच जिल्ह्याचे युनिट राहणार आहे. या जिल्ह्यातील चार महिन्यात हरविलेल्या मुलांची १८ प्रकरणे असल्याचे सिंग यांनी सांगितले.
१ ते ३० जुलै या कालावधीत ‘आॅपरेशन मुस्कान’ राबविण्यात येत आहे. यामध्ये समाजातील सर्वच घटकांचे योगदान घेण्यात येणार आहे. बस्थानक, रेल्वे प्लॅटफॉर्म, धार्मिकस्थळे यांसारख्या ठिकाणी आढळणाऱ्या बेवारस लहान मुलांचा शोध घेतला जाणार आहे. त्यांची ओळख पटविण्यात येणार आहे. शिवाय १८ वर्ष वयोगटाखालील मुले हरविल्यास तत्काळ अपहरणाचा गुन्हा दाखल करून त्याचा शोध घेण्यात येणार आहे.
यवतमाळ जिल्ह्यात २०१० ते २७ मे पर्यंत ५४२ मुलं-मुली हरविले होते. यापैकी ५२६ मुल-मुलींचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले आहे. केवळ १६ प्रकरणांचा तपास सुरू आहे. या अभियानासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, दोन महिला जमादार व दोन पुरूष जमादार यांचे पथक तयार करण्यात आले आहे. यात चांगले काम करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रीयास्तरावर रिवार्ड देण्यात येणार आहे, जेणेकरून हरविलेल्या मुलांबाबत शासन जे अभियान राबवित आहे, त्यामध्ये सर्वांनी परिणामकार कामगिरी बजवावी, असा हेतू आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंग यांनी दिली. पत्रपरिषदेला अपर पोलीस अधिक्षक काकासाहेब डोळे, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक संजय पुज्जलवार उपस्थित होते. (कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: Police today said the 'Operation Smile'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.