आरोपीच्या शोधात पोलीस पथक रवाना

By Admin | Updated: June 19, 2015 02:12 IST2015-06-19T02:12:44+5:302015-06-19T02:12:44+5:30

बोगस कपाशी बी.टी. बियाणे प्रकरणात येथील पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतली.

Police squad to search for accused | आरोपीच्या शोधात पोलीस पथक रवाना

आरोपीच्या शोधात पोलीस पथक रवाना

बोगस बियाणे : बियाणे नमेके कुठे तयार होते?
ंमारेगाव : बोगस कपाशी बी.टी. बियाणे प्रकरणात येथील पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतली. त्यांची पोलीस कोठडी घेतल्यानंतर गुरूवारी त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर या प्रकरणातील आणखी आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांची दोन पथके वेगळवेगळ्या ठिकाणी रवाना झाली आहे.
कपाशीच्या ३३३ बॅगा अनधिकृत बाळगल्याप्रकरणी तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली. या रॅकेटमध्ये आणखी काहींचा समावेश असावा, अशी शंका उपस्थित केली जात होती. पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर त्यांची तीन दिवसांची पोलीस कोठडी घेतली. कोठडीत त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावरून आणखी काही आरोपींना पकडण्यासाठी मारेगाव पोलिसांची दोन पथके गुरूवारी सकाळीच रवाना झाली. मात्र ही पथके नेमकी कुठे गेली, याची माहिती देण्यास पोलीस विभागाने असमर्थता व्यक्त केली.
या बियाण्याच्या बॅग कोठे तयार होतात आणि या प्रकरणात किती लोक गुंतलेले आहे, याचा पोलीस कसून शोध घेत आहे. अवैध बियाणे विक्री प्रकरणात पकडण्यात आलेल्या व तीन दिवसाच्या पोलीस कोठडीत असलेल्या अजय मनोहर नागपूरे (३६) याच्या प्रकृतीत अचानक बिघाड झाल्याने त्याला येथील ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्याच्यावर दिवसभर ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू होते. यात कोणते घबाड हाती लागते, याकडे लक्ष आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Police squad to search for accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.