पोलीस पथक तेलंगणाकडे रवाना
By Admin | Updated: March 9, 2016 00:17 IST2016-03-09T00:17:13+5:302016-03-09T00:17:13+5:30
सोमवारी चनाखा-खैरी जवळ झालेल्या अपघातात ३८ बैल दगावले, ११ जखमी झाले, तर १० ते १२ बैल जिवांच्या आकांताने पळून गेले.

पोलीस पथक तेलंगणाकडे रवाना
३८ बैल मृत प्रकरण : गावकऱ्यांच्या भूमिकेमुळे तणाव
पाटणबोरी : सोमवारी चनाखा-खैरी जवळ झालेल्या अपघातात ३८ बैल दगावले, ११ जखमी झाले, तर १० ते १२ बैल जिवांच्या आकांताने पळून गेले. या घटनेचा तपास करण्यासाठी पोलीस पथक तेलंगणात गेले आहे.
येथून दोन किलोमीटर अंतरावर पिंपळखुटी येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७ वर आर.टी.ओ. चेकपोस्ट आहे. या मार्गाने येणारी ओव्हरलोड व जनावरांची वाहने चेकपोस्टवरून न जाता पांढरकवड्यावरून केळापूरमार्गे जातात. नंतर पारवामार्गे अर्ली येथून पिंपळखुटी गावाला परत राष्ट्रीय महामार्गावर येतात. तेथून तेलंगणात प्रवेश करतात. याच पद्धतीचा अवलंब करून जनावराचे वाहन पिंपळखुटी येथे राष्ट्रीय महामार्गावर येणार होते. मात्र रूढा गावाजवळ खैरी घाटात चढावर कंटेनर उलटला. डंपरमध्ये सुमारे ६० ते ७० बैले होती. बैलांच्या आवाजाने शेजारील शेतातील शेतकरी धावून आले. बैलांना निर्दयी वागणूक दिल्यामुळे घटनास्थळी तणाव निर्माण झाला होता. (वार्ताहर)