लोकमत न्यूज नेटवर्कवणी (यवतमाळ) : लग्नाचे आमिष दाखवून एका युवतीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला सात दिवसांनंतरही अटक करण्यात न आल्याने पीडितेच्या नातलगांसह संतप्त नागरिकांनी सोमवारी सायंकाळी वणी पोलिस ठाण्यावर धडक दिली.
यावेळी नागरिकांनी पोलिस प्रशासनातर तीत नाराजी व्यक्त करीत आरोपीला त्वरित अटक करण्याची मागणी केली. या प्रकरणात पीडित तरुणीने २९ जुलै रोजी वणी पोलिस ठाण्यात ठोस पुराव्यांसह तक्रार दाखल केली होती मात्र सात दिवसानंतरही मेघदूत कॉलनी येथील आरोपी मोहम्मद याला हकीमोद्दीन पठाण (३२) पोलिसांनी अटक केली नाही. परिणामी, पीडितेचे कुटुंबीय आणि परिसरातील नागरिकांनी तणी पोलिस ठाण्यात जाऊन जाब विचारला.
ठाणेदार गोपाल उंबरकर यवतमाळ येथे असल्याने जमाव ठाण्यासमोर एक तास ठिय्या देऊन होता. दरम्यान, ठाणेदार उंबरकर वणी पोलिस ठाण्यात पोहोचले. त्यानंतर त्यांनी नागरिकांसोबत केबिनमध्ये चर्चा केली. एका तरुणीवर अत्याचार झाल्यानंतरही या गंभीर प्रकरणातील आरोपीला पोलिस अटक का करीत नाहीत, असा सवाल नागरिकांनी यावेळी केला. संबंधित आरोपीवर तत्काळ कारवाई करावी आणि पीडितेला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी नागरिकांनी यावेळी केली. या प्रकरणाचा तपास अंतिम टप्प्यात आहे