पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण कार्यशाळा

By Admin | Updated: September 7, 2016 01:41 IST2016-09-07T01:41:02+5:302016-09-07T01:41:02+5:30

यवतमाळ ग्रामीण पोलीस ठाण्यात सोमवारी बारावी शिकत असलेल्या उमेदवारांसाठी व इतरही उमेदवारांसाठी

Police Prenatal Training Workshop | पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण कार्यशाळा

पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण कार्यशाळा

यवतमाळ : यवतमाळ ग्रामीण पोलीस ठाण्यात सोमवारी बारावी शिकत असलेल्या उमेदवारांसाठी व इतरही उमेदवारांसाठी पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण व इतर नोकरीसंदर्भात एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये २०० उमेदवारांनी सहभाग नोंदविला. त्यांना शारीरिक चाचणी व लेखी परीक्षेसंबंधी मार्गदर्शन पोलीस निरीक्षक महिपालसिंग चांदा, सहायक पोलीस निरीक्षक पाचकवडे व पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र मिश्रा यांनी मार्गदर्शन केले. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक समाधान धनरे व इतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. तसेच ८ सप्टेंबर रोजी सकाळी ६ पासून हे प्रशिक्षण पळसवाडी पोलीस ग्राऊंडवर सुरू होणार आहे. इच्छूक उमेदवारांनी या प्रशिक्षणासाठी फॉर्म भरून देणे आवश्यक आहे. पूर्णपणे मोफत असलेल्या या प्रशिक्षणामध्ये दर शनिवारी उमेदवाराची शारीरिक चाचणी व रविवारी लेखी परीक्षा घेण्यात येईल.
प्रशिक्षणाच्या यशस्वीतेसाठी पोलीस कर्मचारी सुनील दुबे, जयंत ब्राह्मणकर, विजय अजमिरे, नितीन कोवे, सत्यजीत मानकर आदी परिश्रम घेत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Police Prenatal Training Workshop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.