अमरावती, दिग्रसवर पोलीस तपास केंद्रीत
By Admin | Updated: September 11, 2016 00:54 IST2016-09-11T00:54:33+5:302016-09-11T00:54:33+5:30
मुंबईच्या व्यापाऱ्यांचे ८० लाखांचे दागिने बसस्थानकावरुन चोरी गेल्याप्रकरणी वडगाव रोड पोलिसांनी अमरावती आणि

अमरावती, दिग्रसवर पोलीस तपास केंद्रीत
८० लाखांची दागिने चोरी : बॅग लिफ्टर
यवतमाळ : मुंबईच्या व्यापाऱ्यांचे ८० लाखांचे दागिने बसस्थानकावरुन चोरी गेल्याप्रकरणी वडगाव रोड पोलिसांनी अमरावती आणि दिग्रसच्या रेकॉर्डवरील बॅग लिफ्टरवर तपास केंद्रीत केला आहे.
मुंबईतील सराफ व्यापाऱ्याचे तीन किलो ३०० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने शुक्रवारी सकाळी ७ वाजता यवतमाळच्या मध्यवर्ती बसस्थानकावरुन चोरीला गेले होते. हा व्यापारी जालना बसमध्ये चढताना त्याची बॅग कापून दागिने पळविण्यात आले. वडगाव रोड पोलिसांनी विविध पैलूंनी या गुन्ह्याचा तपास चालविला आहे. बसस्थानक परिसरातील सीसीटीव्हीमधून काही क्ल्यू मिळतो का या दृष्टीने प्रयत्न चालविले आहे. दिग्रस आणि अमरावतीमधील बॅग लिफ्टर टोळी पोलिसात सर्वदूर परिचित आहे. या टोळीच्या सदस्यांवर पोलिसांनी लक्ष केंद्रीत केले आहे. शिवाय या व्यापाऱ्यांचा मुंबई, आदिलाबाद, यवतमाळ या प्रवासादरम्यान कुणी पाठलाग केला का, हॉटेलपासून कुणी मागावर होते का, कुणी टीप दिली का तसेच खरोखरच ८० लाखांचे सोने बॅगेत होते का, अशा सर्व बाजूंनी तपास केला जात आहे. (कार्यालय प्रतिनिधी)