नेरमध्ये साकारणार पोलीस व्यायामशाळा
By Admin | Updated: November 11, 2016 02:15 IST2016-11-11T02:15:28+5:302016-11-11T02:15:28+5:30
पोलीस मित्रांना परिवाराला व विद्यार्थ्यांना सोयीचे व्हावे, यासाठी नेर पोलीस ठाण्याच्या परिसरात पोलीस व्यायामशाळा साकारणार आहे.

नेरमध्ये साकारणार पोलीस व्यायामशाळा
नेर : पोलीस मित्रांना परिवाराला व विद्यार्थ्यांना सोयीचे व्हावे, यासाठी नेर पोलीस ठाण्याच्या परिसरात पोलीस व्यायामशाळा साकारणार आहे. पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांच्या हस्ते गुरुवारी दुपारी या व्यायामशाळेचे भूमिपूजन पार पडले.
नेर शहरातील नागरिकांना मोफत व्यायामशाळा उपलब्ध व्हावी, पोलीस मित्र परिवार व विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी १२ लाख रुपयांचे नियोजन मंजूर झाले आहे. नियोजित बांधकामाचे भूमिपूजन गुरुवारी दुपारी ४.३० वाजता पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांच्या हस्ते झाले. यावेळी ठाणेदार संजय पुज्जलवार, उपनिरीक्षक अविनाश इंगळे, विजय गरूड आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
या व्यायामशाळेमुळे शहरातील युवकांना नियमित व्यायाम करणे सोयीचे होणार आहे. सक्षम युवकांची फळी तयार होईल, असे प्रतिपादन पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांनी केले. पोलीस बांधवांची कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. कार्यक्रमासाठी हरिचंद्र काटे, राम यादव, गुणवंत पाटील, सचिन तंबाखे, रामधन पवार यांनी परिश्रम घेतले.
(तालुका प्रतिनिधी)
पोलीस व्यायामशाळेच्या मंजुरीमुळे विद्यार्थ्यांना नियमित व्यायाम करणे सोयीचे होईल. पोलीस अधीक्षकांच्या परिश्रमामुळे हे शक्य झाले.
- संजय पुज्जलवार
ठाणेदार, नेर